दहावीचा पेपर लिहीत असतानाच प्रसूतीवेदना, शाळेच्या वॉशरुममध्येच मुलीने बाळाला जन्म दिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:41 IST2026-02-25T16:40:57+5:302026-02-25T16:41:55+5:30

एका परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली कारण परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला.

mp 10th board student gave birth in exam center bathroom her family unaware she was pregnant | दहावीचा पेपर लिहीत असतानाच प्रसूतीवेदना, शाळेच्या वॉशरुममध्येच मुलीने बाळाला जन्म दिला!

दहावीचा पेपर लिहीत असतानाच प्रसूतीवेदना, शाळेच्या वॉशरुममध्येच मुलीने बाळाला जन्म दिला!

मध्य प्रदेशात सध्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. धार जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली कारण परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलें. रुग्णालयात पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

विद्यार्थिनी एका खासगी परीक्षा केंद्रावर १० वीचा पेपर देत होती. पेपर सोडवत असतानाच तिला कळा सुरू झाल्या. त्यानंतर ती बाथरुममध्ये गेली आणि तिथेच तिने एका बाळाला जन्म दिला. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेला बोलावण्यात आली आणि तिला सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. हे संपूर्ण प्रकरण सेक्टर-१ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाउसिंग बोर्ड कॉलनीतील एका खासगी शाळेतील आहे.

मुलगी सध्या अल्पवयीन आहे. ती गरोदर कशी राहिली, याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली असता तिने सांगितलं की, एका तरुणाशी ती गेल्या दोन वर्षांपासून संपर्कात होती. तो वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता आणि त्यातूनच ती गरोदर राहिली. मुलीच्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

ही विद्यार्थिनी गणिताचा पेपर देत होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलं की, ती बाथरूममध्ये गेल्यानंतर १५ मिनिटं होऊनही बाहेर आली नाही. त्यानंतर एका महिला कर्मचाऱ्याने आत जाऊन पाहिलं असता, तिने बाळाला जन्म दिल्याचं दिसलं. विद्यार्थिनी बेटमा पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी आहे. ती कान्हा बर्मन नावाच्या तरुणाच्या संपर्कात होती.

याच दरम्यान ती गरोदर राहिली, मात्र तिच्या कुटुंबीयांना या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती. प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टरांनी सांगितलं की, विद्यार्थिनी आणि नवजात बाळ दोन्ही सुखरूप आहेत. सध्या दोघांनाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला  आहे. 

Web Title : दसवीं की छात्रा ने स्कूल के बाथरूम में बच्चे को जन्म दिया; माता-पिता अनजान

Web Summary : मध्य प्रदेश में, दसवीं कक्षा की एक छात्रा ने परीक्षा के दौरान स्कूल के बाथरूम में बच्चे को जन्म दिया। उसने एक युवक के साथ दो साल के संबंध का खुलासा किया जिसने कथित तौर पर उसका शोषण किया, जिससे गर्भावस्था हुई। पुलिस जांच कर रही है, और माँ और बच्चा दोनों सुरक्षित हैं।

Web Title : Tenth-grader Gives Birth in School Bathroom; Parents Unaware

Web Summary : In Madhya Pradesh, a tenth-grade student gave birth in a school bathroom during exams. She revealed a two-year relationship with a young man who allegedly abused her, leading to the pregnancy. Police are investigating, and both mother and baby are safe.