काँग्रेसकडून अजून एका राज्यात नेतृत्वबदलाच्या हालचाली? सचिन पायलट दिल्लीत दाखल, राहुल-प्रियंकांसोबत बैठक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 09:17 PM2021-09-24T21:17:02+5:302021-09-24T21:18:40+5:30

Rajasthan News: पंजाबमध्ये नेतृत्व बदल करत ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून घेतल्यानंतर आता काँग्रेसने अजून एका राज्यात नेतृत्व बदलाबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

Movements for change of leadership from Congress to another state? Sachin Pilot arrives in Delhi, starts meeting with Rahul and Priyanka | काँग्रेसकडून अजून एका राज्यात नेतृत्वबदलाच्या हालचाली? सचिन पायलट दिल्लीत दाखल, राहुल-प्रियंकांसोबत बैठक सुरू

काँग्रेसकडून अजून एका राज्यात नेतृत्वबदलाच्या हालचाली? सचिन पायलट दिल्लीत दाखल, राहुल-प्रियंकांसोबत बैठक सुरू

Next

नवी दिल्ली - पंजाबमध्ये नेतृत्व बदल करत ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून घेतल्यानंतर आता काँग्रेसने अजून एका राज्यात नेतृत्व बदलाबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील नेते सचिन पायलट हे मंत्री रघू शर्मा यांच्यासह दिल्लीत दाखल झाले आहेत. येथे राहुल गांधींच्या निवासस्थानी त्यांची प्रियंका गांधींसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. दरम्यान, जयपूरमध्ये सचिन पायलट यांनी स्पीकर सी.पी. जोशी यांच्याशीही चर्चा केली होती. सचिन पायलट यांना दिल्लीला बोलावून घेण्याची ही दुसरी वेळ आहे. (Movements for change of leadership from Congress to another state? Sachin Pilot arrives in Delhi, starts meeting with Rahul and Priyanka Gandthi)

पंजाबप्रमाणेच राजस्थानमध्येही मुख्यमंत्री बदलण्यात यावा, अशी मागणी सचिन पायलट यांचे समर्थक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला महत्त्व आले आहे. राजस्थानमध्ये सरकारचे नेतृत्व आता सचिन पायलट यांच्याकडे सोपव पाहिजे, अशी पायलट यांच्या समर्थकांची मागणी आहे. सचिन पायलट मुख्यमंत्री बनावे ही काँग्रेस कार्यकर्तेच नाही  तर जनतेचीही अपेक्षा आहे, असे राजस्थान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पायलट यांचे निकटवर्तीय राजेंद्र चौधरी यांनीही नुकतेच असे विधान केले होते. दरम्यान, गहलोत गटाकडूनही पलटवार करण्यात येत आहे. राजस्थानमध्ये नेतृत्व परिवर्तनाची गरज नाही, असे अशोक गहलोत गटाकडून सांगण्यात येत आहे.

पंजाबनंतर आता काँग्रेसकडून राजस्थानमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील महिन्यापर्यंत राज्यातील मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होऊ शकतात. यामध्ये सचिन पायलट गटाला महत्त्वपूर्ण वाटा मिळू शकतो. त्याची ब्लू प्रिंट तयार केली जात आहे. सध्या पक्षामध्ये याबाबत विचारविनिमय सुरू आहे. मात्र काँग्रेस हायकमांड पंजाबप्रमाणे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा विचार करत नाही आहे, असेही सूत्रांनी सांगितले. सध्यातरी अशोक गहलोत यांना अधिक वेळ देण्याचा पक्षाचा विचार आहे. 

Web Title: Movements for change of leadership from Congress to another state? Sachin Pilot arrives in Delhi, starts meeting with Rahul and Priyanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.