नसोसवायएफचा चार तास ठिय्या शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याणसमोर आंदोलन
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:38+5:302015-02-11T00:33:38+5:30
नॅशनल एस़सी़, एस़टी़, ओबीसी स्टुडण्टस ॲन्ड यूथ फ्रंटच्या वतीने शिष्यवृत्ती व विद्यावेतनामधील समस्यांच्या संदर्भात समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर चार तास ठिय्या आंदोलन केले़ त्यात शैक्षणिक वर्ष संपत आले तरी, भारत सरकार शिष्यवृत्तीचे वाटप करीत नसल्याचा निषेध करण्यात आला़

नसोसवायएफचा चार तास ठिय्या शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याणसमोर आंदोलन
न शनल एस़सी़, एस़टी़, ओबीसी स्टुडण्टस ॲन्ड यूथ फ्रंटच्या वतीने शिष्यवृत्ती व विद्यावेतनामधील समस्यांच्या संदर्भात समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर चार तास ठिय्या आंदोलन केले़ त्यात शैक्षणिक वर्ष संपत आले तरी, भारत सरकार शिष्यवृत्तीचे वाटप करीत नसल्याचा निषेध करण्यात आला़ मास्टेक नावाच्या निकृष्ट सॉफ्टवेअरमुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती भरण्यापासून वंचित राहिले आहेत़ अनेक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कासंदर्भात माहितीच कळविली जात नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही़ शासन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून इमारत विकास निधी, परिक्षा शुल्क प्रवेशाच्या वेळेस घेण्यात येवू नये असा आदेश असतानाही नांदेड शहरातील अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून सक्तीने शुल्क वसूल केल्या जात आहे़ अशा महाविद्यालयावर समाजकल्याण विभागाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली़ व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना २००४ पासून विद्यावेतन दिले जाते़ परंतु समाजकल्याण कार्यालयातील काही कर्मचार्यांमुळे त्यांना त्यापासून वंचित ठेवले जात आहे़ आदी अनेक मागण्यांच्या संदर्भात संघटनेने ठिय्या आंदोलन करीत सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला़ आंदोलनात रवि सुर्यवंशी, बालाजी कोंडामंगल, संघरत्न निवडंगे, गणेश येरेकर, नागेश सोनुले, धम्मा वाढवे, जयवर्धन भोसीकर, संतोष यमकुरे, दीपक वाघमारे, बाळू भाग्यवंत, राजेश गोणारकर, अभिमान राऊत, संतोष खानापूरकर, अमोल पाईकराव, राहूल गायकवाड, सुयश नेत्रगांवकर, निलेश पडघणे, आशुतोष कोंडामंगल, अभिजित बरडे यांचा सहभाग होता़