शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

....एक दिवस पाकिस्तानला पराभव मान्य करावाच लागेल- हंसराज अहिर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 4:35 PM

नी एक गोळी चालवली, तर आमच्याकडून 10 गोळ्या चालवल्या जातील.

भारतीय सैन्याच्या प्रतिहल्ल्यांमुळे पाकिस्तानला एक दिवस पराभव मान्य करावाच लागेल, असे हंसराज अहिर यांनी सांगितले. भारतीय सैन्य सीमेवर प्रत्युत्तर देत आहे. आपल्याला एक पाऊलही मागे हटण्याची गरज नाही. भारतीय सैन्य आपल्या संपूर्ण ताकदीने लढत आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांनी एक गोळी चालवली, तर आमच्याकडून 10 गोळ्या चालवल्या जातील. एक दिवस पाकिस्तानला पराभव मान्यच करावा लागेल, असे हंसराज अहीर यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रकार वाढले आहेत. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तान बदला घेण्याच्या उद्देशाने आणि आपली आपली कातडी वाचवण्यासाठी वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. शस्त्रसंधी उल्लंघन करताना पाकिस्तान जाणुनबुजून सीमारेषेवरील गावांना लक्ष्य केले जात आहे. 

पाकिस्तानने बदला घेण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या सैन्यांना भारतीय बीएसएफ जवान, लष्कर यांच्यासोबत स्थानिकांनाही टार्गेट करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी (कव्हरिंग फायर) भारतीय चौक्यांवर गोळीबार केला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये या घटना वाढल्या होत्या. यावेळीही 150 ते 200 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यासाठी भारतीय सैन्याने प्रो-अॅक्टिव्ह ऑपरेशन हाती घेतले आहे. या मोहीमेतंर्गत भारतीय सैन्याने गुरुवारी मेंढर सेक्टरमधील चौक्यांना रॉकेट आणि उखळी तोफांच्या माऱ्याने लक्ष्य केले. या हल्ल्यात पाकिस्तानी चौक्या आणि बंकर्स पूर्णपणे बेचिराख झाले होते. 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनHansraj Ahirहंसराज अहिरPakistanपाकिस्तान