शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कोरोनाचा कहर : आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ; देशात चोवीस तासांत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 11:08 AM

Coronavirus Updates : देशात आतापर्यंत सर्वात मोठी रुग्णवाढ, ८३९ रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत सर्वात मोठी रुग्णवाढ८३९ रुग्णांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून देशातून धडकी भरवणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी समोर येताना दिसत आहे. सध्या देशात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंदही होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यानी आता पुन्हा एकदा कठोर निर्बंध घालण्यास सुरूवात केली आहे. देशात गेल्या चोवीस तासांमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८०० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यूही झाल्याचं समोर आलं आहे.देशात गेल्या चोवीस तासांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली असून १ लाख ५२ हजार ८७९ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ८३९ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे गेल्या चोवीस तासांमध्ये ९० हजार ५८४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. दरम्यान, ही देशातील आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ आहे.  सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ३३ लाख ५८ हजार ८०५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी २० लाख ८१ हजार ४४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ११ लाख ०८ हजार ०८७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात नागरिकांना १० कोटी १५ लाख ९५ हजार १४७ लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस