शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
2
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
3
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
4
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
5
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
6
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
7
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
8
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
9
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
10
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
11
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
12
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
13
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
14
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
15
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
16
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक सुधारणेवर मूडीजची मोहोर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांनी व्यक्त केले समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 12:38 IST

जीएसजी आणि नोटाबंदीच्या निर्णयांमुळे केंद्रातील मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था मूडीजने भारताच्या वाढवलेल्या पतमानांकनामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली -  जीएसजी आणि नोटाबंदीच्या निर्णयांमुळे केंद्रातील मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होत आहे.  त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था मूडीजने भारताच्या वाढवलेल्या पतमानांकनामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. मूडीजचे रेटिंग जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी समाधान व्यक्त केले आहे.पीएमओ इंडिया या ट्विटर अकाउंटवर मूडीजच्या रेटिंगवर प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या सुधारांमुळे औद्योगित क्षेत्रातील वातावरण, उत्पादन, परकीय आणि अंतर्गत गुंतवणूक वाढणार आहे. तसेच अर्थव्यवस्थेला मजबूती येऊन वाढ होईल, असा विश्वास मूडीजने व्यक्त केला आहे. तर   मोदी सरकारने आर्थिक सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे प्रतिबिंब मूडीजने भारताच्या वाढललेल्या पतमानांकनामध्ये दिसले आहे, असे अमित शहा यांनी ट्विटरवर म्हटले आहे. मूडीजने भारताचे वाढवलेले पतमानांकन गुजरात निवडणुकीदरम्यान भाजपासाठी सुचिन्ह ठरण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या निर्णयामुळे देशातील उद्योगधंदे डबघाईस आले असल्याचा आरोप करत काँग्रेससह इतर विरोधी पक्ष मोदी सरकार विरोधात आवाज उठवत आहेत. मात्र मूडीजसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताचे पतमानांकन वाढवल्याने भाजपाला विरोधी पक्षांना प्रत्युत्तर देणे शक्य होणार आहे.  आंतरराष्ट्रीय रेटिंग्ज एजन्सी 'मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला आहे. भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने  'मूडीज्'ने हा निर्णय घेतला आहे.  

या रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे. 'मूडीज्'ने 2004 साली बीएए 3 हे रेटिंग दिले होते, त्यानंतर आता ते वाढवून बीएए 2  करण्यात आले. या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे. "भारत सरकारने उचललेल्या पावलांमुळे अंतर्गत व परदेशी गुंतवणूक वाढेल, शाश्वत व भक्कम वाढीस प्राधान्य मिळेल, व्यवसायात चांगली स्थिती निर्माण होईल. वृद्धीची आणि विविध धक्के पचवण्याची क्षमता वाढवणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता वाढण्यास या सुधारणांचा फायदा होईल" असे 'मूडीज्'ने  प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

जीएसटी आणि नोटाबंदी निर्णयामुळे उद्योगावर परिणाम झाला, अशी सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. विरोधकांनी सरकारला या मुद्यावर गेले वर्ष धारेवर धरले असताना 'मूडीज्'ने वाढवलेले रेटिंग सरकारला दिलासादायक ठरणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुजरात निवडणुकांमध्ये याचा उपयोग नरेंद्र मोदी यांचे सरकार निश्चितच या मुद्याचं उपयोग करुन घेईल. याआधीही उद्यम सुलभतेत भारताने उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल केंद्र सरकारला जगातिक संस्थांची शाबासकी मिळाली आहे.दरम्यान, मूडीजच्या अहवालाचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले आहे.   सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होताच सेन्सेक्सने 381 अंकांची उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 109 अंकांची वाढ झाली. 400 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 33,520 अंकांवर पोहोचला होता.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतGovernmentसरकारEconomyअर्थव्यवस्थाNote Banनोटाबंदी