Monsoon: ऑगस्टमध्ये कमी पाऊस, मान्सून गेला कुठे? अलनिनोचा प्रभाव, चिंता वाढवणारी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 00:16 IST2023-08-13T00:16:18+5:302023-08-13T00:16:53+5:30
Monsoon 2023: जुलै महिन्यात धो धो बरसलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सतत दुष्काळी वातावरण असताना मान्सून एक टक्क्याच्या घटीसह निगेटिव्ह झोनमध्ये गेला आहे.

Monsoon: ऑगस्टमध्ये कमी पाऊस, मान्सून गेला कुठे? अलनिनोचा प्रभाव, चिंता वाढवणारी माहिती
जुलै महिन्यात धो धो बरसलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सतत दुष्काळी वातावरण असताना मान्सून एक टक्क्याच्या घटीसह निगेटिव्ह झोनमध्ये गेला आहे. जुलै महिन्यातही एकूण मान्सूनमध्ये ५ टक्क्यांनी घट नोंदवली गेली. यादरम्यान, अल निनो कमकुवत झाल्याने मध्यम स्थितीमध्ये मजबूत झाला आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत मान्सून दीर्घकाळाच्या सरासरीच्या २९ टक्क्यांनी कमी राहिला आहे. दक्षिण भारतामध्ये तो विशेष करून शुष्क राहिला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, मान्सूनमध्ये अडथळा ५-६ ऑगस्टच्या मध्यावरून सुरू झाला होता. तो १६ ऑगस्टपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर कमी दबावाच्या क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, २४ ऑगस्टपर्यंत देशाच्या इकप भागात तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या दृष्टीने ऑगस्टमध्ये पाऊस कमी होणे निश्चित आहे. मात्र सक्रिय काळानंतर देशामध्ये सध्याच्या मान्सूनमध्ये अडथळे असामान्य नाही आहेत. अंदाजित दीर्घकाळामुळे मान्सूनच्या उर्वरित काळात पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार पूर्व भारतामध्ये बिहार, झारखंड, आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये आणि ओदिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि इतरच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र २० ऑगस्टनंतरही देशभरात व्यापर पावसाची शक्यता नाही आहे. अमेरिकी संस्थांच्या नव्या रिपोर्टच्या आधारावर हवामान तज्ज्ञ आणि केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन यांनी सांगितले की. २० ऑगस्टनंतर देशभरात व्यापक पावसाची शक्यता नाही. आहे.