शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

मनी पेज : स्टॉक मार्केट

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

सेन्सेक्स १६१ अंकांनी तेजीत

सेन्सेक्स १६१ अंकांनी तेजीत
शेअर बाजार : कारखाना उत्पादन समाधानकारक राहिल्याचा परिणाम
मुंबई : नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६१ अंकांनी वाढून २६,५८६.५५ अंकांवर बंद झाला. कारखाना उत्पादनाची आकडेवारी समाधानकारक राहिल्यामुळे बाजारात तेजी परतली आहे. महागाईचा पारा आणखी खाली आल्याचाही चांगला परिणाम बाजारात दिसून आला.
मान्सूनची दमदार सुरुवात झाल्यामुळेही बाजाराची धारणा वाढली आहे, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सने आज जोरदार उसळी घेतली. एका क्षणी तो २६,७२८.६0 अंकांपर्यंत वर चढला होता. त्यानंतर मात्र नफा वसुलीचा जोर बाजारात वाढला. त्यामुळे सेन्सेक्स थोडा खाली आला. तथापि, सत्राच्या अखेरीस तो १६१.२५ अंकांची अथवा 0.६१ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २६,५८६.५५ अंकांवर बंद झाला. आदल्या सत्रात सेन्सेक्सने ५४.३२ अंकांची वाढ मिळविली होती.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८ हजार अंकांची पातळी ओलांडण्यात यशस्वी ठरला. ३१ अंकांची अथवा 0.३९ टक्क्यांची वाढ नोंदविणारा निफ्टी ८,0१३.९0 अंकांवर बंद झाला.
सन फार्मा, बजाज ऑटो, एचडीएफसी आणि आरआयएल या कंपन्यांचे समभाग वाढल्याने सेन्सेक्सचा आलेख वर चढला. सेन्सेक्समधील ३0 पैकी १७ कंपन्यांचे समभाग वाढले. केयर्न इंडियाचा समभाग ३.७९ टक्क्यांनी वाढला. वेदांताचा समभाग मात्र १.४९ टक्क्यांनी घसरला.
व्यापक पातळीवर मात्र बाजारात संमिश्र कल दिसून आला. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.४२ टक्क्यांनी वाढला. मीडकॅप मात्र 0.0१ टक्क्यांनी घसरला. त्याआधी शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात ६७0.९६ कोटींचे समभाग विकल्याचे आज जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसून आले.
जागतिक पातळीवर आशियाई बाजारात घसरणीचा कल दिसून आला. युरोपीय बाजारांतही सकाळी घसरणीचा कल होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)