शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

मनी पेज : आरबीआय

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

यंदा पहिल्या सहामाहीत होऊ

यंदा पहिल्या सहामाहीत होऊ
शकते अर्धा टक्का दर कपात
अर्धा टक्का : २0१५ मध्ये महागाई नियंत्रणात राहणार

नवी दिल्ली : महागाईच्या दरात घसरण होत असल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून २0१५ सालच्या पहिल्या सहामाहीत धोरणात्मक व्याजाच्या दरात अर्ध्या टक्क्याची कपात होऊ शकते. या क्षेत्रातील जाणकारांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.
जागतिक पातळीवर ब्रोकरिंगचे काम करणार्‍या बँक ऑफ अमेरिका, मेरिल लिंच, बार्कलेज, सिटी ग्रुप आणि एचएसबीसी यांच्या मते, २0१५ हे संपूर्ण वर्ष महागाईच्या दृष्टीने अनुकूल राहू शकते. वास्तविक मान्सून कसा राहतो, यावर बरेच काही अवलंबून राहील. मान्सून चांगला राहिला नाही, तर महागाईची जोखीम वाढू शकते. तथापि, मान्सून येईपर्यंत वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहतील, अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाआधीच धोरणात्मक व्याजदरांत कपात करण्यास मोठा वाव आहे.
एचएसबीसीने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात म्हटले की, मार्च-एप्रिलमध्ये रिझर्व्ह बँक धोरणात्मक व्याजदरात पाव टक्का कपात करू शकते. त्यानंतर जूनमध्ये पुन्हा पाव टक्क्याची कपात होऊ शकते. याचाच अर्थ पहिल्या सहा महिन्यांत एकूण अर्ध्या टक्क्याची कपात झालेली असेल.
बोफा-एमएलच्या अभ्यासात म्हटले आहे की, ७ एप्रिल रोजीच्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे पाव टक्क्याची कपात करू शकतात. जूनमध्ये पुन्हा तेवढीच कपात होण्याची शक्यता आहे.
सिटी ग्रुपने म्हटले की, अर्थसंकल्पामुळे निर्माण होणार्‍या अपेक्षा पाहता व्याजदरात जवळपास पाऊण टक्का कपात करण्यास वाव आहे. यावर आताच निर्णायक वक्तव्य करता येणार नाही. जीडीपीसंबंधी रिझर्व्ह बँकेचे आकडे काय असतात यावर बरेच काही अवलंबून राहील. तरीही सध्याची परिस्थिती कपातीला अनुकूल आहे, असे संकेत मिळत आहेत. जूनपर्यंत ही कपात होऊ शकते.