सोशल मीडियावर आपल्या मोहक हास्याने आणि 'महाकुंभ' मधील रुद्राक्ष विकण्याच्या व्हिडिओमुळे रातोरात स्टार झालेली मोनालिसा आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मोनालिसाने तिचा बॉयफ्रेंड फरमान खानसोबत गुपचूप विवाह उरकला आहे. प्रियकर मुस्लिम असल्याने तिला वडिलांचा विरोध पत्करावा लागला होता. म्हणून त्यांनी केरळमध्ये जात दोन पद्धतींनी लग्न केले आहे.
अनेकांना आठवत असेल प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये मोनालिसा नावाची तरुणी माळा विकताना प्रचंड व्हायरल झाली होती. यामुळे तिला चित्रपटात काम करण्याची ऑफरही आली होती. पुढे तिचे विमानात बसल्याचे, मुंबईला आल्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता थेट तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. मोनालिसा आणि फरमान खान यांचे हे लग्न आंतरधर्मीय असल्याने अभिनेत्रीच्या पालकांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. मात्र, प्रेमाखातर मोनालिसाने घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याने केरळ गाठले आणि तिथे आधी 'कोर्ट मॅरेज' केले. त्यानंतर तिरुवनंतपुरममधील अरुमनूर नैनार मंदिरात हिंदू रीतिरिवाजांनुसार हा विवाह केला. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या लग्नाला संरक्षण दिले होते.
'मोनालिसा अल्पवयीन नाही'; पतीने दाखवला पुरावासोशल मीडियावर मोनालिसा १८ वर्षांची नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर तिचा पती फरमान खानने माध्यमांसमोर येऊन थेट 'मॅरेज सर्टिफिकेट' आणि 'आधार कार्ड' दाखवले. फरमान म्हणाला, "अनेक ठिकाणी अफवा पसरवली जात आहे की मोनालिसा अल्पवयीन आहे, पण ते खोटे आहे. ती १८ वर्षांची आहे आणि आमच्याकडे त्याचे सर्व कायदेशीर पुरावे आहेत."
६ महिन्यांच्या प्रेमाचा असा झाला शेवटफरमान स्वतः एक अभिनेता असून त्यांची ओळख एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. "आमचे प्रेम ६ महिन्यांचे असले तरी ते ६० वर्षांइतके घट्ट आहे," अशा भावना फरमानने व्यक्त केल्या. मोनालिसानेच आधी प्रपोज केल्याचेही त्याने सांगितले. सध्यातरी हे जोडपे केरळमध्येच स्थायिक होण्याचा विचार करत आहे.
Web Summary : Monalisa, famed from Mahakumbh videos, secretly married Farman Khan, facing parental opposition due to religious differences. They wed in Kerala, with court and Hindu ceremonies. Farman refuted claims of Monalisa being underage, presenting legal proof.
Web Summary : महाकुंभ वीडियो से मशहूर मोनालिसा ने फरमान खान से गुपचुप शादी कर ली, धार्मिक मतभेद के कारण माता-पिता का विरोध था। उन्होंने केरल में कोर्ट और हिंदू रीति-रिवाजों से शादी की। फरमान ने मोनालिसा के नाबालिग होने के दावों का खंडन किया और कानूनी सबूत पेश किए।