मोकोकचुंग
By Admin | Updated: January 17, 2017 05:30 IST2017-01-17T05:30:21+5:302017-01-17T05:30:21+5:30
नागालँड राज्यात मोकोकचुंग जिल्ह्यात मोकोकचुंग हे गाव आहे.

मोकोकचुंग
नागालँड राज्यात मोकोकचुंग जिल्ह्यात मोकोकचुंग हे गाव आहे. हे जिल्ह्याचे मुख्यालय आणि उत्तर नागालँडमधील महत्वाचे नागरी केंद्रदेखील आहे. येथे नाताळचा सण, नूतन वर्षाचे स्वागत खूपच खर्च करून केले जाते. येथील ९५ टक्क्यांपेक्षाही जास्त लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे. १९ व्या शतकात नागालँडमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला तो आवोस लोकांनी. अशियातील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक या गावात आहे. येथे इतर धर्मीय लोक आहेत. त्यात हिंदू, शिख व इस्लामी असून ते बहुतेक स्थलांतरीत व्यावसायिक व भारतातून आले आहेत.
फूटबॉल, बास्केटबॉल आणि क्रिकेट हे येथील लोकप्रिय खेळ. येथे बास्केटबॉलचे दोन कोर्ट तर फूटबॉलची दोन आणि क्रिकेटचे एक मैदान आहे.