शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळासाठी मोदींचे कठोर नियम

By admin | Updated: December 24, 2014 02:00 IST

नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर येऊन सात महिने उलटल्यानंतर काही कॅबिनेट मंत्र्यांना आपले स्वीय सचिव, विशेष ड्युटीवरील अधिकारी नियुक्त करणे कठीण जात आहे.

हरिश गुप्ता, नवी दिल्लीनरेंद्र मोदी सरकार सत्तेवर येऊन सात महिने उलटल्यानंतर काही कॅबिनेट मंत्र्यांना आपले स्वीय सचिव, विशेष ड्युटीवरील अधिकारी नियुक्त करणे कठीण जात आहे. पंतप्रधानांच्या अखत्यारीतील कार्मिक खात्यातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वीय सचिव व विशेष अधिकारी नियुक्त करण्याची परवानगी न मिळालेल्यांत मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी याही असून, त्यांचे विशेष अधिकारी म्हणून संजय कचरू कार्यरत आहेत. संजय कचरू यांना ही नियुक्ती मिळालेली असली तरीही त्याला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी नाही. तरीही ते महत्त्वाचे निर्णय धडाधडा घेत आहेत. कचरू हे जम्मूतील भाजपा नेते आहेत़ कचरू यांचे हे काम नियुक्ती समितीने घालून दिलेल्या नियमांविरोधात आहे. कारण समितीच्या नियमानुसार पंतप्रधान कार्यालयाच्या मंजुरीखेरीज कोणतीही नियुक्ती होऊ शकत नाही. ईशान्य विकास मंत्रालयाचे सचिव राजीव टकरू (आयएएस) यांना आपले मंत्री जन. व्ही़ के़ सिंग यांची माहिती उघड केल्याची किंमत मोजावी लागलेली आहे. पंतप्रधान कार्यालयाची लेखी परवानगी नसताना स्वीय सचिव नियुक्त करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. संपुआ २ च्या सांस्कृतिक मंत्री चंद्रेश कुमारी काटोच यांच्या खाजगी कर्मचाऱ्यांच्या यादीत असणारे १९९७च्या बॅचचे पोलीस अधिकारी डॉ. राजेशकुमार यांची नियुक्ती व्ही़ पी़ सिंग यांनी केली. पंतप्रधान कार्यालयाने या नियुक्तीस मंजुरी दिली नाही. या वादात टकरू यांना पद सोडावे लागल. अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनाही आलेला अनुभव असाच आहे. संसद सचिवालयात काम करणारे बद्रुद्दीन हे स्वीय सचिव म्हणून हेपतुल्ला यांना हवे होते. बद्रुद्दीनही हेपतुल्ला यांचे स्वीय सचिव म्हणून आले, पण पंतप्रधानांना हे मंजूर नव्हते. राज्यसभेत २० वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या हेपतुल्ला यांनाही गप्प बसावे लागले. मंत्रिमंडळातील सदस्यांचे वैयक्तिक अधिकारी म्हणून काम करणाऱ्या लोकांबाबत पंतप्रधान मोदी थोडे अधिकच कडक आहेत. विशेषत्वाने हे अधिकारी संपुआ सरकारच्या काळातील असतील तर मोदी यांचा विशेष कटाक्ष आहे. गृहमंत्री राजनाथसिंग व ग्राहक तक्रार निवारण मंत्री रामविलास पासवान यांनाही त्यांच्या आवडीचे स्वीय सचिव मिळालेले नाहीत.