शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

मोदींचा पुढील अजेंडा ‘एक देश एक निवडणूक’, सर्व पक्षीय पाठिंब्यासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 6:18 AM

‘एक देश एक निवडणूक’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच एक समिती स्थापन करतील अशी शक्यता आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : ‘एक देश एक निवडणूक’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच एक समिती स्थापन करतील अशी शक्यता आहे. दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावून मोदींनी यासंदर्भातील संकेत दिले होते, हे विशेष. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी सर्व पक्षांच्या नेतृत्वाचे मत जाणून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. मोदींनी आधीच या दिशेने पाऊल टाकले असल्यामुळे आता समितीच्या माध्यमातून विविध भागांमधील माहिती प्राप्त होण्याची ते प्रतीक्षा करतील. नरेंद्र मोदी यांनी एक देश, एक कर, एक रेशन कार्डची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमधून ३७० व ३५ए कलम हटविले. आता पुढील १०० दिवसांमध्ये ‘एक देश एक निवडणूक’ हीच योजना त्यांच्या अजेंड्यावर असणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावरून विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भातील त्यांचे मनसुबेही स्पष्ट होतात. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये विधी आयोगाने दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास मोठ्या प्रमाणात खर्च टाळता येईल, अशी शिफारस केली होती. पण, विधी मंत्रालयाने कायद्यात सुधारणा केल्याशिवाय तसेच लोकसभा व राज्यसभेत या बाजूने बहुमत सिद्ध केल्याशिवाय ते शक्य नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतरच नरेंद्र मोदी यांनी राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.

शिफारशींना महत्त्व नाहीकलम ३७० आणि ३५ ए हटविण्यासाठी दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाल्यामुळे ‘एक देश एक निवडणूक’च्या मंजुरीसाठीही सरकार प्रयत्न कमी पडू देणार नाही. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी त्यांची ‘थिंक टँक’ किंवा नीती आयोगाच्या शिफारशीही फारशा गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. नीती आयोगाने २०२४ पासून दोन टप्प्यांमध्ये या निवडणुका घेण्याचा विचार मांडला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकIndependence Dayस्वातंत्र्य दिन