शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मोदींची निवडणुकांपूर्वीची शेवटची 'मन की बात' ठरली 'शहिदों की बात' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 12:04 PM

भारतीय सैन्यानं नेहमीच कमालीचं धाडस दाखवलं आहे. एकीकडे संयम आणि धैर्य बाळगताना दुसरीकडे दहशतवादी आणि शत्रू राष्ट्रांना सैन्याने जशास तसे उत्तर दिले आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा निवडणुकापूर्वीची शेवटची 'मन की बात' केली. आजच्या मन की बात 'नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक'ची माहिती दिली. सोमवार 25 फेब्रुवारी रोजी या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. देशाच्या लढवय्या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचं मोदींनी म्हटलंय. शेवटच्या मन की बात कार्यक्रमात मोदींनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तर, लोकसभा निवडणुकांपूर्वीची मन की बात ही 'शहीद जवानांची बात' ठरली.

भारतीय सैन्यानं नेहमीच कमालीचं धाडस दाखवलं आहे. एकीकडे संयम आणि धैर्य बाळगताना दुसरीकडे दहशतवादी आणि शत्रू राष्ट्रांना सैन्याने जशास तसे उत्तर दिले आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वी भारतमातेने अनेक जवान गमावले आहेत. देशभरातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे देशात सपोर्ट फॅमिली ऑफ शहीद जवान अशी लाट आल्याचे मोदींनी सांगितले. या हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुबीयांनी दाखवलेलं धैर्य आणि देशभक्ती देशासाठी प्रेरणादायी ठरली आहे. शहीद कुटुंबीयांच्या या धैर्यामुळे देशातील नागरिकांचा जोश अधिकच वाढल्याचेही मोदींनी म्हटले. 

मुस्लिम देशांची ताकदवान संघटना असलेल्या ओआयसीने (OIC) आपल्या 46 व्या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी भारताला आमंत्रित केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जगातील बहुतांश देश भारताच्या पाठीशी असून भारताला जागतिक स्तरावर मोठे यश मिळाल्याचं मोदींनी म्हटले. देशातील जवानांच्या धाडसाचे आणि शौर्याचे नेहमीच कौतुक होते. मात्र, आजपर्यंत या शहीद जवानांचे एकही स्मारक नसल्याची खंत मोदींनी बोलून दाखवली. तर, दिल्ली गेटजवळ उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे लोकार्पण 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येईल. हे स्मारक शहिदांच्या बलिदानाचे प्रतिक असेल, असेही मोदींनी सांगितले. राष्ट्रीय सैनिक स्मारकाची संकल्पना ही, अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र, रक्षक चक्र या चार वीर चक्रांवर आधारित असल्याचेही मोदींनी सांगितले. दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशातील नागरिकांसोबतच मीही या निवडणुकांमध्ये सक्रीय सहभागी असणार आहे. या निवडणुकीत मी उमेदवार असणार आहे. त्यामुळे यानंतरची 'मन की बात' मे महिन्यातील शेवटच्या रविवारी होईल, असेही मोदींनी सांगितले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदMan ki Baatमन की बात