शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या शिस्तीला सरकारी बाबूंचा प्रखर विरोध

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

कामकाजाचा हिशेब ठेवणाऱ्या यंत्रांची तोडफोड

कामकाजाचा हिशेब ठेवणाऱ्या यंत्रांची तोडफोड

नितीन अग्रवाल : नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिस्त शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अजिबात भावलेली नाही. कार्यालयीन कामासाठी वेळेवर कार्यालयात पोहोचण्यास हे बाबू काही तयार नाहीत. बाबू आणि सरकार यांच्यात शिस्त पालनावरून ओढाताण सुरू झाली आहे आणि सरकारी बाबू माघार घ्यायला तयार नसल्याचे दिसत आहे.
केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी बाबूंच्या कार्यालयात येणे आणि जाण्याच्या वेळेचा रेकॉर्ड ठेवणाऱ्या बायोमेट्रिक यंत्रांपैकी ५० हून जास्त यंत्रांची तोडफोड करण्यात आली आहे किंवा ते चोरी तरी गेले आहेत. बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम (बीएएस) लावणाऱ्या केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या बाबत संबंधित विभागांकडे रीतसर तक्रारही केलेली आहे. विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात बायोमेट्रिक यंत्राची मोडतोड आणि यंत्र गायब होण्याच्या घटना अतिशय गंभीर असल्याचे नमूद केले आहे. संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या या पत्रात मोडतोड झालेल्या वा चोरी गेलेल्या बायोमेट्रिक यंत्रांच्या जागी आता नवे यंत्र बसविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ही नवी बायोमेट्रिक यंत्रे लावण्याचा खर्च संबंधित विभागांनीच करावयाचा आहे, हेही त्यात आवर्जून सांगण्यात आले आहे.
लावण्यात आलेल्या बीएएस यंत्रांपैकी ३६ यंत्रांचे चार्जर फोडण्यात आले आहेत. १३ यंत्रांना जोडण्यात आलेले टॅबलेट तोडण्यात आल्याचे दिसून आले आहे. २ यंत्रांचे फिंगर प्रिंट स्कॅनर फोडण्यात आले आहेत तर दोन ठिकाणी यंत्रेच गायब आहेत, असे या पत्रात म्हटले आहे. केंद्र सरकारच्या ज्या मंत्रालयांचे बाबू मोदींच्या मिशन बीएएसचा सर्वाधिक विरोध करीत आहेत, त्यात परराष्ट्र, पेट्रोलियम, मानव संसाधन, क्रीडा, आरोग्य, कृषी आणि कंपनी कामकाज मंत्रालयांचा समावेश आहे. या मंत्रालयांपैकी बहुतांश मंत्रालयांची कार्यालये शास्त्री भवन, कृषी भवन, श्रमशक्ती भवन, निर्माण भवन, लोकनायक भवन आणि राष्ट्रीय मीडिया केंद्र (एनआयसी) येथे आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे ज्या एनआयसीमधून बीएएस प्रकल्प संचालित केला जातो त्याच एनआयसीमध्ये सर्वांत जास्त बायोमेट्रिक यंत्रांची तोडफोड करण्यात आली आहे. यांपैकी बहुतांश कार्यालयांमध्ये सामान्य लोकांना प्रवेश बंदी आहे आणि जवळपास सर्वच कार्यालयांमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात असतात.
नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट डिजिटल इंडिया अंतर्गत केंद्र सरकारच्या दिल्लीतील सर्वच कार्यालयांमध्ये किमान १००० बायोमेट्रिक हजेरी यंत्रे, ५००० फिंगर प्रिंट स्कॅनर्स आणि डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन करणारे २०० स्कॅनर लावण्यात आले होते. ही यंत्रे फ्रान्सच्या मोफार्े नावाच्या कंपनीकडून खरेदी करण्यात आली होती आणि त्यांना कर्मचाऱ्यांच्या आधार कार्डला जोडण्यात (लिंक) आले होते. देशभरातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची हजेरी बीएएसला जोडण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
कर्मचाऱ्यांची हजेरी लाईव्ह बघण्याची व्यवस्था
सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती केवळ बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली नसून त्यांची उपस्थिती आता थेट (लाईव्ह) बघण्याचीही सोय करण्यात आली आहे. त्यासाठी अटेंडन्स.जीओव्ही.आयएन (ं३३ील्लिील्लूी.ॅङ्म५.्रल्ल) ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटनुसार शुक्रवारी २९ जानेवारीला केंद्र सरकारच्या एकूण ९५७०० कर्मचाऱ्यांपैकी ५१८०१ कर्मचारी कार्यालयात आले होते. ४३६ कार्यालयांमध्ये ७५९ बायोमेट्रिक यंत्रे काम करीत होती. बीएएसचा वापर करणाऱ्यांपैकी ६१.९ टक्के कर्मचारी वेळेवर कार्यालयात पोहोचले. ७.२ टक्के कर्मचारी निर्धारित १० वाजतानंतर आले आणि ३.१ टक्के कर्मचारी सकाळी ११ वाजता कामावर आले. याशिवाय किमान २७.८ टक्के कर्मचारी वेळेच्या आधीच कार्यालयात पोहोचले होते.

३६ चार्जरची तोडफोड/चोरी
१३ टॅबलेट फोडले
२ फिंगर प्रिंट स्कॅनर फोडले
२फिंगर प्रिंट स्कॅनरची चोरी