"मोदीजी 56 इंचांची छाती..., ट्रम्प करू शकतात तर तुम्ही काय...!"; मादुरो यांच्या अटकेवरून ओवेसी यांची मोठी मागणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 11:56 IST2026-01-04T11:55:27+5:302026-01-04T11:56:01+5:30
मदुरो यांच्या अटकेनंतर संपूर्ण जगात खळभळ उडाली आहे. यातच, रशिया आणि चीनसारख्या देशांनी अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला आहे...

"मोदीजी 56 इंचांची छाती..., ट्रम्प करू शकतात तर तुम्ही काय...!"; मादुरो यांच्या अटकेवरून ओवेसी यांची मोठी मागणी?
अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर सैन्य कारवाई करत, तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना ताब्यात घेत अमेरिकेत नेले. या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून आता एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
"५६ इंचाची छाती' असेल तर..." -
मुंबईमध्ये शनिवारी एका जनसभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले, "नरेंद्र मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, जर ट्रम्प आपले सैन्य पाठवून व्हेनेझुएलामधून तिथल्या अध्यक्षांना उचलू शकतात, तर मोदीजी '५६ इंचाची छाती' आहे, तर पाकिस्तानात घुसून २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहर आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना उचलून आणा भारतात." एवढेच नाही तर, "जर ट्रम्प करू शकतात, तर आपण आकय कमी आहात का? जर ट्रम्प करू शकतात तर आपल्यालाही करावेच लागेल," असेही ओवेसी म्हणाले.
#WATCH | Mumbai | AIMIM chief Asaduddin Owaisi said, "Today we heard that US President Donald Trump's forces captured Venezuelan President Nicolas Maduro and took him from his country to America. If US President Donald Trump can abduct Venezuelan President Nicolas Maduro from his… pic.twitter.com/OTLyZJ4goK
— ANI (@ANI) January 3, 2026
भारतीय नागरिकांनी व्हेनेझुएलामध्ये अनावश्यक प्रवास टाळावा -
व्हेनेझुएलातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता, भारत सरकारने शनिवारी (३ जानेवारी २०२६) रात्री उशिरा एक ट्रॅव्हल अॅडव्हायजरी (Travel Advisory) जारी केली आहे. यात, भारतीय नागरिकांनी व्हेनेझुएलामध्ये अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. तसेच तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याच्या आणि काराकस येथील भारतीय दूतावासच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या व्हेनेझुएलामध्ये किती भारतीय? -
सध्या व्हेनेझुएलामध्ये साधारण ५० अनिवासी भारतीय आणि ३० भारतीय वंशाचे लोक वास्तव्यास आहेत. मदुरो यांच्या अटकेनंतर संपूर्ण जगात खळभळ उडाली आहे. यातच, रशिया आणि चीनसारख्या देशांनी अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला आहे.