डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 07:28 IST2025-09-07T07:25:57+5:302025-09-07T07:28:02+5:30

Donald trump Narendra Modi: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफबद्दल नरमाईची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेचे पंतप्रधान मोदींनी स्वागत केले आहे.

Modi welcomes Donald Trump's positive stance; says, "Between India and America..." | डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."

Tariff on India : भारत-अमेरिका संबंधांबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप यांचे कौतुक केले. यापूर्वी ट्रंप यांनी दोन्ही देशांच्या विशेष संबंधांचे कौतुक केले होते. त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, 'नेहमीच मोदी हे माझे मित्र राहतील. मात्र, सध्या मोदी जे करत आहेत, त्या गोष्टी मला पसंत नाहीत.' आपल्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीबद्दल ट्रंप यांनी नेमके स्पष्टीकरण दिलेले नाही.

याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही राष्ट्रपती ट्रंप यांच्या भावना आणि आमच्या संबंधांबाबतच्या त्यांच्या सकारात्मक सल्ल्याचे कौतुक करतो आणि त्यांचे पूर्णपणे समर्थन करतो. भारत आणि अमेरिका यांदरम्यान सकारात्मक, दूरदर्शी, व्यापक आणि जागतिक भागिदारी आहे.

दोन्ही नेत्यांच्या १७ जून रोजी झालेल्या दूरध्वनीवरील चर्चेनंतर प्रथमच दोघांनीही एकमेकांबाबतचे वक्तव्य केले आहे. भारतीय वस्तूंवर ५० टक्के टेरिफ लागू करण्याच्या ट्रंप यांच्या निर्णयानंतर लागू करण्याच्या ट्रंप यांच्या निर्णयानंतर दोन्ही देशांच्या तणावात वाढ झाली. पैकी २५ टक्के शुल्क रशियाकडून कच्चे तेल खरेदीवर लागू केले होते.

यापूर्वी, भारताशी संबंध पुन्हा स्थापित करण्याच्या शक्यतेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देशांचे विशेष संबंध आहेत आणि यात "काळजी करण्यासारखे काहीही नाही."

ट्रम्प यांनी गुरुवारी म्हटले होते की अमेरिका चीनकडून भारताला हरवत आहे. या पोस्टबद्दल विचारले असता, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, "मला वाटत नाही की असे घडले आहे. भारत रशियाकडून इतके तेल खरेदी करत आहे, याबद्दल मी खूप निराश आहे. मी त्यांना सांगितले की आम्ही भारतावर खूप जास्त शुल्क लादले आहे. ५० टक्के शुल्क खूप जास्त आहे. तुम्हाला माहिती आहेच की, माझे मोदींशी खूप चांगले संबंध आहेत. ते काही महिन्यांपूर्वी येथे आले होते.

Web Title: Modi welcomes Donald Trump's positive stance; says, "Between India and America..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.