शहरं
Join us  
Trending Stories
1
मित्रपक्षानं महायुतीची साथ सोडली; विधानसभेला स्वबळावर २० जागा लढण्याची घोषणा
2
'खेला होबे'! भाजपाचे ३ खासदार TMC च्या संपर्कात असल्याचा दावा; संख्या २३७ होणार?
3
नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम
4
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अर्शदीप सिंगची पहिल्याच षटकात ऐतिहासिक भरारी! अमेरिकेचे २ फलंदाज पाठवले माघारी
5
झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू
6
खिशात ठेवलेला मोबाईल वाजला, उचलण्यापूर्वीच झाला स्फोट; तरुण जखमी
7
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
8
ओडिशात पहिल्यांदाच BJP सरकार; मोहन चरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ...
9
Maharashtra Politics : अजित पवार बारामतीमध्ये दीड लाख मतांनी जिंकतील; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास
10
भारतापेक्षा ३ पटीनं अधिक पैसे; कुवैतमध्ये छोट्या कामासाठी मिळतो 'इतका' पगार
11
महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित
12
"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"
13
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
14
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...
15
Ration Card Aadhar Card : सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली
16
"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला
17
Maratha Reservation : "थोडं सबुरीने घ्या आणि सरकारला वेळ द्या"; मनोज जरांगे पाटलांना केंद्रीय मंत्र्यांची विनंती
18
मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास
19
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश
20
घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर 

काँग्रेस मुख्यालयाच्या आवारात फिरताना दिसले 'मोदी', लोकांनी विचारले 15 लाख कधी देणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 11:02 AM

बुधवारी लखनौमधील काँग्रेसच्या मुख्यालयाच्या आवारात नरेंद्र मोदींना फिरताना पाहून तिथे उपस्थित असलेल्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

लखनौ -   बुधवारी लखनौमधील काँग्रेसच्या मुख्यालयाच्या आवारात नरेंद्र मोदींना फिरताना पाहून तिथे उपस्थित असलेल्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे काय काँग्रेसच्या मुख्यालयात येऊ शकतात? असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र काही वेळातच सत्य समोर आले.  काही वेळाने हे गृहस्थ पंतप्रधान नरेद्र मोदी नसून, त्यांच्यासारखे दिसणारे अभिनंद पाठक असल्याचे उघड झाले. ते काँग्रेसचे उत्तर प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात आले होते.   त्यानंतरही आमचे 15 लाख रुपये कधी देणार? असा सवाल करत उपस्थितांनी त्यांच्या प्रश्नांची सरबत्ती केली.  काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असलेला प्रश्नांचा मारा पाठक यांनी शांतपणे ऐकून घेतला. त्यानंतर "या प्रश्नांमुळेच मला स्वत:ला काँग्रेसमध्ये यावे लागले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात प्रचार करण्याचा आपला मानस आहे," असे त्यांनी सांगितले.  सहारनपूर येथील रहिवासी असलेले अभिनंद पाठक पुढे म्हणाले की, "2015 ची दिल्ली विधानसभा आणि 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने माझा पुरेपूर वापर करून घेतला." एकेकाळी भाजपाच्या प्रचार सभांचे आकर्षण ठरलेल्या अभिनंद पाठक यांनी 1999 साली लोकसभा आणि 2012 साली विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्याशिवाय त्यांनी सहारनपूर येथून दोन वेळा नगरसेवक म्हणूनसुद्धा प्रतिनिधित्व केले आहे.  "मी स्वत: मोदींचा पाठीराखा आहे. ते मला भेटले होते, माझी गळाभेटही त्यांनी घेतली. पण त्यांचे सरकार निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळेच मी भाजपाविरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी राज बब्बर यांना राहुल गांधी यांच्याशी भेट घालून देण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझी इच्छा त्यांना सांगू शकेन." सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपा सरकारबाबत प्रचंड राग असल्याचेही पाठक यांनी सांगितले. "अच्छे दिनच्या अपेक्षेने जनतेने मोदींना निवडले होते. मात्र काळानुसार परिस्थिती बिघडत गेली. त्यामुळेच सर्वसामान्य लोकांचा मोदींवरील विश्वास उडाला आहे. आता तर लोक इतके त्रस्त आहेत की ते मला वाईटसाईट बोलून मारायलाही धावतात, असे पाठक म्हणाले.  

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश