शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोदी पंतप्रधान; शहेनशहा नाहीत

By admin | Updated: June 1, 2016 03:49 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात साजरा करण्यात येत असलेल्या आनंदोत्सवावर सडकून टीका केली आहे.

रायबरेली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात साजरा करण्यात येत असलेल्या आनंदोत्सवावर सडकून टीका केली आहे. मोदी देशााचे पंतप्रधान आहेत, शहेनशहा नाहीत. परंतु त्यांच्या मंत्र्यांना याचे भान राहिले नसून एखाद्या शहेनशहाप्रमाणे ते उत्सव साजरा करीत आहेत, अशी तोफ त्यांनी डागली.सोनिया गांधी त्यांच्या रायबरेली मतदारसंघात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी डलमऊ येथे पोहोचल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढविला. मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंत्र्यांद्वारे साजरा करण्यात येत असलेल्या उत्सवाकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, मी आजवर असे कधी बघितले नाही. देशात दुष्काळ पडला आहे. शेतकरी संकटात आहेत. गरिबीने लोकांचे बेहाल आहेत. अशा परिस्थितीत उत्सव साजरे करणे कितपत योग्य आहे? मी असा पंतप्रधान कधीच बघितला नाही. (वृत्तसंस्था) भाजपाचा प्रतिहल्लारॉबर्ट वाड्रा यांचा बचाव आणि पंतप्रधानांना शहेनशहा संबोधित केल्याबद्दल भाजपाने सोनिया गांधींवर पलटवार केला. काँग्रेस अध्यक्षांच्या बचावानेवाड्रा केवळ एक नागरिक आहेत या खोटारडेपणाचा पर्दाफाश झाला असून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने शहेनशहाचा बोऱ्याबिस्तर बांधला होता, अशी टीका या पक्षाने केली. वाड्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करा या गांधी यांच्या आव्हानावरही भाजपाने फिरकी घेतली. विरोधी पक्षाने यापूर्वीच सूडभावनेने प्रेरित असल्याचे म्हटले होते, राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी लक्ष वेधले.