शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी केवळ देशाचे पंतप्रधान, 'शहेनशहा' नव्हे - सोनिया गांधी

By admin | Updated: May 31, 2016 13:55 IST

नरेंद्र मोदी हे देशाचे फक्त पंतप्रधान आहेत, शहेनशहा नव्हेत अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी मोदींवर हल्ला चढवला.

ऑनलाइन लोकमत
रायबरेली, दि. ३१ - 'नरेंद्र मोदी हे देशाचे फक्त पंतप्रधान आहेत, शहेनशहा नव्हेत' अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी मोदींवर हल्ला चढवला. मोदी सरकार सत्तेवर येऊन २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील इंडिया गेट येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच सोहळ्यावर टीका करताना सोनिया गांधीनी पंतप्रधानांवरही हल्ला चढवाल. 
' मी असा प्रकार (सोहळा) कधीच पाहिला नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत, ते आत्महत्या करत आहेत. आणि अशी परिस्थिती असतानाच दुसरीकडे सरकारने दोन वर्ष पूर्ण केल्याचा आनंदोत्सव साजरा केला जात. आपण पंतप्रधान आहोत, राजा नव्हे हे मोदींनी लक्षात ठेवले पाहिजे' अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. 
दरम्यान यावेळी त्यांनी जावई रॉबर्ट वद्रा यांच्यावर झालेल्या आरोपप्रकरणीही वक्तव्य केले. ' हा प्रकार म्हणजे काँग्रेसमुक्त भारतासाठीचे भारतीय जनता पक्षाने रडलेले एक षडयंत्र, कट आहे. भाजपा नेते रोज नवनवीन प्रकरणे पुढे आणतात आणि आरोपांच्या फैरी झाडतात. त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्या पुराव्यांची कोणतीही भेदभाव न करता चौकशी व्हावी व आपले म्हणणे (त्यांनी) सिद्ध करावे' असेही सोनिया यांनी म्हटले. 
शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारीच्या व्यवहारांच्या चौकशीमध्ये त्याचे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वद्रांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. आयकर खात्याने संजय भंडारीचे व्यवहार तपासले त्यातून ही बाब समोर आली. मध्य लंडनमधील एका घराच्या खरेदीशी रॉबर्ट वद्रा यांचे नाव जोडले जात आहे.