शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नव्हे भारतीय लष्करानं केलाय - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 10:43 AM

सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेस अध्यक्षराहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केलं नाही तर भारतीय लष्करानं केलं आहे. नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारनं केल्याचं सांगत लष्कराचा अपमान करत आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. 

राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. तसंच, 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन भाजपानं खोटं दिलं होतं. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमचा मुख्य मुद्दा रोजगारीचा आहे. मोदी सरकारनं केलेली नोटाबंदीची योजना फसली असून त्याला काँग्रेसची न्याय योजना उत्तर देणार आहे. न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. 

याचबरोबर, मसूद अझहरला भाजपानं देशाबाहेर सोडलं, असा आरोप करत मसूद अझहर हा दहशतवादी आहे, त्याच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, असं राहुल गांधी म्हणाले. याशिवाय, देशातील निवडणूक आयोग पूर्णपणे एकांगी असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला. 

गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, ते घाबरतात. दबाव आला की नरेंद्र मोदी पळून जातात, असा त्यांचा स्वभाव आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तसंच, देशाचा पंतप्रधान कोण असेल, या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, 'देशाचे लोक जे ठरवतील, तो पंतप्रधान मला मान्य असेल, मात्र सध्या माझं काम हे देशाच्या संस्थांना वाचवणं आहे.'

चौकीदार चोर है, या वक्तव्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची मागितली आहे. मात्र या नाऱ्याबद्दल माफी मागितली आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. तसंच राफेल करारातून चौकीदारानं 30 हजार कोटींची चोरी केल्याचा आरोपही नरेंद्र मोदींवर केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक