शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार नरमले!

By admin | Updated: March 11, 2015 02:55 IST

लोकसभेने अखेर मंगळवारी वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवली आहे. सरकारने लोकसभेतील परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी राज्यसभेतील लढाई बाकी आहे.

नवी दिल्ली : लोकसभेने अखेर मंगळवारी वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवली आहे. सरकारने लोकसभेतील परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी राज्यसभेतील लढाई बाकी आहे. मागे हटणार नसल्याचा घोषा लावणाऱ्या मोदी सरकारने विरोधकांच्या प्रचंड दबावासमोर झुकत ९ अधिकृत दुरुस्त्या स्वीकारल्या; तर आणखी दोन दुरुस्त्या जोडत या विधेयकाचा कायदेशीर मार्ग प्रशस्त केला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राजद आणि बीजदने सभात्यागाचा मार्ग निवडला; तर कट्टर विरोधक असलेला रालोआतील घटक पक्ष शिवसेनेने गैरहजर राहात विरोध कायम असल्याचे दाखवून दिले. योग्य मोबदल्याचा अधिकार आणि भूसंपादनात पारदर्शकता, पुनर्वसन आणि पुनर्व्यवस्था(सुधारित) विधेयक २०१५ वर लोकसभेने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. रालोआचा घटक असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी पक्षाने आणलेली दुरुस्ती फेटाळली गेली. विरोध आणि विविध पातळीवरील सल्लामसलत लक्षात घेऊन सरकारने ज्या नऊ दुरुस्त्या स्वत:हून ज्या नऊ दुरुस्त्या मांडल्या त्या तुलनेने जुजबी आहेत. ७० टक्के भूमीधारकांची संमती असेल तरच जमीन संपादित करता येईल व ‘सोशल इन्पॅक्ट अ‍ॅसेसमंट’ केल्यशिवाय जमीन घेता येमार नाही, ही आधीच्या कायद्यातील बगळण्यात आलेली बंधने पुन्हा अंतर्भूत करावीत, ही विरोधकांची प्रमुख मागणी मात्र सरकारने मान्य केली नाही. तसेच हे विधेयक सविस्तर विश्लेषणासाठी प्रवर समितीकडे पाठविणेही सरकारला मान्य झाले नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्र पक्ष आणि विरोधकांना सोबत घेऊन जाण्याचे संकेत दिले होते. संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडूंनी सोमवारी नरमाईची भूमिका अवलंबली होती, त्याची परिणती दिसून आली.राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गाच्या दुतर्फा एक कि.मी.पर्यंत औद्योगिक कॉरिडॉर सिमित ठेवण्यासह भूमीहीन शेतमजूरांच्या झळ पाहोचणाऱ्या कुटुंबांना अनिवार्य रोजगार, जिल्हा स्तरावर तक्रारींचा निपटारा आणि निवाडा, कमीत कमी जमीन अधिग्रहण यासारख्या ११ अधिकृत सुधारणा मंजूर करणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली, नायडू, ग्रामीण विकास मंत्री चौधरी वीरेंद्रसिंग यांनी भूसंपादन विधेयकावर विरोधी पक्षांशी चर्चा घडवून मन वळविण्याचे प्रयत्न चालविले होते. विरोधकांच्या चिंता दूर करण्यावर भर देत या विधेयकात सुधाराण घडवून आणणार असल्याचे वीरेंद्रसिंग यांनी स्पष्ट केले आहे.सरकारने प्रारंभी नऊ दुरुस्त्यांची यादी जारी केली असून विधेयकाच्या त्यानुसार बदल करणार असल्याचे नमूद केले आहे. तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी एक यंत्रणा अस्तित्वात आणण्यासह सार्वजनिक- खासगी सहभागातील सामाजिक पायाभूत प्रकल्पांसाठी देण्यात आलेली सवलत हटविण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे. मूळ कायद्यात अशा प्रकल्पांसाठी ताब्यात घेतल्या जाणाऱ्या जमिनीसाठी किमान ७० टक्के जमीन मालकांची सहमती अनिवार्य केली होती. त्यासह विरोधकांनी काही सुधारणा सूचविल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)