आता भ्रष्ट आणि अपात्र कर्मचारी मोदी सरकारच्या रडारवर, रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 08:08 PM2020-08-30T20:08:21+5:302020-08-30T20:11:13+5:30

सरकारी कर्मचार्‍यांचे रेकॉर्ड केंद्रातील मोदी सरकार तपासणार आहे.

modi government employees completing 30 years service records corrupt retired | आता भ्रष्ट आणि अपात्र कर्मचारी मोदी सरकारच्या रडारवर, रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना

आता भ्रष्ट आणि अपात्र कर्मचारी मोदी सरकारच्या रडारवर, रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना

Next
ठळक मुद्देसरकारी कर्मचार्‍यांचे रेकॉर्ड केंद्रातील मोदी सरकार तपासणार आहे. यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार आता भ्रष्ट आणि अपात्र सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे. याबाबत मोदी सरकारने अशा सरकारी कर्मचार्‍यांना ओळखण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच, भ्रष्ट व अपात्र कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीसाठीही मोदी सरकारकडून आग्रह केला जात आहे.

सरकारी कर्मचार्‍यांचे रेकॉर्ड केंद्रातील मोदी सरकार तपासणार आहे. यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. याअंतर्गत अक्षमता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी केली जाईल. यात जे भ्रष्ट, अपात्र असल्याचे आढळतील, त्यांना निवृत्त होण्यास सांगितले जाईल. याबाबत, एक रजिस्टरही तयार करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याअंतर्गत केंद्र सरकारने सरकारी सेवेत ३० वर्षे पूर्ण केलेल्या किंवा ५०-५५ वर्ष असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेची नोंद तपासण्यास सांगितले आहे. ३० वर्षे पूर्ण झालेल्या किंवा ५०-५५ वर्षे वयाच्या सरकारी कर्मचार्‍यांच्या सेवेच्या नोंदीमध्ये अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

वेळेआधी सेवानिवृत्ती
कर्मचारी योग्यरित्या काम करीत आहेत की जनतेच्या हिताचा विचार करता त्यांना वेळेआधी निवृत्ती द्यावी, याबाबत सर्व्हिस रेकॉर्डचे परीक्षण केल्यावर निर्णय घेण्यात आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, कार्मिक मंत्रालयाने सर्व सचिवांना एक रजिस्टर तयार करण्यास सांगितले, ज्यामध्ये या सर्व माहितीची नोंद केली जाईल. कर्मचारी योग्यरित्या काम करीत आहेत की जनतेच्या हिताचा विचार करता त्यांना वेळेआधी निवृत्ती द्यावी, याबाबत सर्व्हिस रेकॉर्डचे परीक्षण केल्यावर निर्णय घेण्यात आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, कार्मिक मंत्रालयाने सर्व सचिवांना एक रजिस्टर तयार करण्यास सांगितले, ज्यामध्ये या सर्व माहितीची नोंद केली जाईल.

आणखी बातम्या...

- सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता    

- आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो 

- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

-  धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

Web Title: modi government employees completing 30 years service records corrupt retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.