शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

भारताचा ड्रॅगनला दणका! चिनी कंपन्यांची कंत्राटं रद्द; आर्थिक कोंडी करण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:17 IST

आर्थिक कोंडी करण्याची तयारी सुरू; हुवेईकडून ५-जी सेवा घेणार नाही; भारताचा कठोर संदेश

नवी दिल्ली : चीनच्या धमक्यांना भीक न घालता भारताने सीमेवर युद्धसज्जता करून राजनायिक, आर्थिक तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणातही चीनची कोंडी सुरू केली आहे. सीमेलगत लष्करी हालचाली वाढवून ड्रॅगनला झुकवण्यासाठी चिनी कंपन्यांना दिलेली दोन कंत्राटेही भारताने रद्द केली. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात ५ जी नेटवर्कसाठी हुवेई या चिनी कंपनीची निवडही रद्द करून भारताने कठोर संदेश आंतरराष्ट्रीय समुदायात चीनची तळी उचलणाऱ्यांना दिला आहे.येत्या २३ जूनला होणाऱ्या रशिया व चिनी परराष्ट्र मंत्र्यांसमवेत बैठकीत सहभागी होण्याचे ठरवून भारताने मुत्सद्देगिरीतही नवा पायंडा पाडला. गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर आपला एकही सैनिक चीनच्या ताब्यात नाही, असेही भारताने स्पष्ट केले. या आक्रमक भूमिकेमुळे मवाळ झालेल्या चीनने आम्ही चर्चेने प्रश्न सोडवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र भारतामुळेच हे घडल्याची कागाळीही केली. अर्थात पाकिस्तान व नेपाळ वगळता एकही देश आता चीनची बाजू घ्यायला तयार नाही. त्यामुळे चीन एकाकी पडत आहे.चीनच्या हल्ल्याची संतप्त प्रतिक्रिया देशात उमटली होता. आजचा दिवसही घडामोडींचा ठरला. गलवान खोºयात दोन्ही देशांच्या मेजर जनरलची चर्चा सहा तासांनंतरही संपली. चीनने ६ जूनला ठरल्याप्रमाणे जैसे थे स्थिती स्वीकारावी, यावर भारत ठाम आहे. स्थिती पूर्ववत करण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. शुक्रवारीदेखील ही चर्चा होईल. 

शांतता हवी, पण भूभाग सोडणार नाहीचर्चेने वाद मिटवण्यावर व सीमेवर शांतता राखवण्यावर आमचा भर आहे. पण आमचा भूभाग चीनच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही ठामपणे सांगितले. पंतप्रधान म्हणाले त्या प्रमाणे सार्वभौमत्व व सीमासुरक्षेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा इशारा परराष्टÑ प्रवक्त्याने दिला. नरेंद्र मोदी यांनी आज परराष्ट्र व संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करूनघडामोडींची माहिती करून घेतली. आर्थिक आघाडीवरही अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचे बैठकांचे सत्र सुरू आहे.

सुखोई, मिग विमानांची खरेदी लगेचचसंरक्षण सिद्धतेत भर घालण्यासाठी २१ सुखोई व २१ मिग लढाऊ विमानांच्या खरेदीची प्रक्रिया वेगाने केली जाईल. हवाई दलाने तसा प्रस्ताव याआधीच संरक्षण मंत्रालयास पाठवला आहे.एकूण ५ हजार कोटींच्या या खरेदीची प्रक्रिया पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल.

ड्रॅगनच्या शेपटीवर घावचीनने याचप्रकारे कुरापती काढण्याचे सुरू ठेवल्यास हाँगकाँग, तैवान आणि तिबेटबाबत चीनच्या विरोधात भूमिका घेऊ न, ड्रॅगनची शेपटी आवळण्याची तयारी भारताने ठेवली आहे. तिबेट, हाँगकाँग व तैवानबाबत अन्य देश सतत चीनवर टीका करीत असले तरी आतापर्यंत भारताने स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. पण आता या प्रश्नावरही चीनविरोधात भूमिका घेण्याची वेळ आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.भारत केंद्रस्थानी : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्यपदी भारताची निवड झाली. १९२ पैकी १८४ सदस्यांनी भारताच्या बाजून मतदान केले. भारत अस्थायी सदस्य झाल्याने आता जागतिक शांततेसाठी एकत्र प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिली.नौदल, हवाई दल सज्जदोन्ही देशांतील चर्चा निष्फळ ठरत असल्याने भारताने नौदल व हवाई दल यांना सज्स राहण्यास सांगितले आहे. तसेच सीमेवर जास्तीत जास्त जवान तैनात करण्यात आले आहेत. सर्व समुद्री सीमांवर नौदलाचे सैनिक सज्ज असून, युद्धनौका, विमानवाहू नौका याही तयारीत आहेत.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन