आमदार कन्येचे मंगळसूत्र हिसकावले सोलापूर स्थानकावरील घटना : पालकमंत्र्यांची लोहमार्ग पोलिसात धाव
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30
आमदार कन्येचे मंगळसूत्र हिसकावले

आमदार कन्येचे मंगळसूत्र हिसकावले सोलापूर स्थानकावरील घटना : पालकमंत्र्यांची लोहमार्ग पोलिसात धाव
आ दार कन्येचे मंगळसूत्र हिसकावलेसोलापूर स्थानकावरील घटना : पालकमंत्र्यांची लोहमार्ग पोलिसांत धावसोलापूर : कर्नाटकातील भाजपा आमदार नारायणसा भांडगे यांच्या कन्येचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार सोलापूर स्थानकावर रविवारी दुपारी १२़४५ च्या सुमारास घडला़ या घटनेनंतर त्यांच्या मदतीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे लोहमार्ग पोलिसांकडे धावून आले़ मात्र, चोरांचा माग लागू शकला नाही़ कर्नाटक विधानपरिषद सदस्य नारायणसा भांडगे हे कुटुंबासह सोलापुरात नातेवाईकांकडे घरगुती कार्यक्रमासाठी आले होते़ आमदार भांडगे हे कारने, तर मुलगी रुपा काटवा आणि सासरचे सात-आठ लोक हे बागलकोट रेल्वेने सोलापूरला निघाले़ रविवारी दुपारी रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर ३ वर थांबली आणि डब्यातून लोक खाली उतरु लागले़ सर्व पुरुष नातेवाईक पुढे उतरत होते आणि सर्वात मागे रुपा राहिल्या़ गर्दीत त्या खाली उतरत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारुन पळविले़ याची किमत सुमारे एक लाख २५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले़ त्यानंतर स्थानकावर गोंधळ झाला़ या प्लॅटफॉर्मवर दोन पोलीस कर्मचारीही तैनात होते, मात्र त्यांच्याही लक्षात आले नाही़ याचवेळी रुपा यांनी कारमधून येत असलेले आमदार पिता नारायण भांडगे यांना लोहमार्ग पोलिसात बोलावून घेतले़ (प्रतिनिधी)सीसीटीव्ही फुटेज निष्फळ स्थानकावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दोन सीसी कॅमेरे बसविलेले आहेत़ या कॅमेरांच्या नियंत्रण कक्षाची चावी आरपीएफ पोलिसांना लवकर मिळाली नाही़ मिळाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता या घटनेचे चित्रणच झाले नाही़ या स्थानकावर एकूण २४ सीसी कॅमेरे बसविले आहेत़ एकातही चोरटे निदर्शनास आलेले नाहीत़ विशेषत: हे कॅमेरे २० फुटांपेक्षा जास्त अंतरावर चित्रीकरण करण्यात असमर्थ दिसतात़ त्यामुळे चित्रीकरणात चोरटे दिसत नाहीत़ पालकमंत्र्यांनी मारला ठिय्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे कार्यकर्त्यांसह लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले़ रुपा आणि त्यांचे वडील, नातेवाईकदेखील पोलीस ठाण्यात आले़ पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांच्याशी घटनेची चर्चा केली़ कोणत्याही परिस्थितीत चोरट्यांना शोधून काढा, असा ह धरुन पालकमंत्री पोलिसांपुढे बसले़ यावेळी सीसीटीव्ही फुटेज तपासले़ मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही़