'आमचे म्हणने ऐका, बुलेटप्रूफ गाडीचा वापर करा', पोलिसांचे भाजप आमदाराला आवाहन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:14 IST2025-06-02T12:13:56+5:302025-06-02T12:14:47+5:30

MLA Raja Singh: भाजप आमदार कुठल्याही सुरक्षेविना संवेदनशील भागाचे दौरे करत आहेत.

MLA Raja Singh: 'Listen to our words, use bulletproof vehicle', police request BJP MLA | 'आमचे म्हणने ऐका, बुलेटप्रूफ गाडीचा वापर करा', पोलिसांचे भाजप आमदाराला आवाहन...

'आमचे म्हणने ऐका, बुलेटप्रूफ गाडीचा वापर करा', पोलिसांचे भाजप आमदाराला आवाहन...

MLA Raja Singh: तेलंगणा राज्यातील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार ठाकूर राजा सिंह पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे नाही, तर जीवाला धोका असल्यामुळे चर्चेत आले आहेत. राजा सिंह सुरक्षेशिवाय संवेदनशील भागाचे दौरे करतात, त्यामुळे हैदराबाद पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून, त्यात बुलेटप्रूफ वाहन आणि सुरक्षा कर्मचारी (१+४) वापरण्याचा सल्ला दिला आहे. 

राजा सिंह यांना नोटीस 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगलहाट पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार ठाकूर राजा सिंह यांना औपचारिक नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये, त्यांना सरकारने दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे पालन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, विशेषतः ज्या भागात सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील परिस्थिती आहे.

बुलेटप्रूफ वाहन वापरण्याची विनंती...
१ जून रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सहकार्य करणे ही आमदाराची जबाबदारी आहे. तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ वाहन वापरण्याची आणि सरकारने पुरवलेल्या (१+४) सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सक्तीने वापर करण्याची विनंती करण्यात येत आहे.

अत्यंत संवेदनशील भागात गेले
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आमदार राजा सिंह यांना वारंवार धमकीचे फोन येत आहेत. असे असूनही, ते बुलेटप्रूफ वाहन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय संवेदनशील भागात जात आहेत. ३१ मे रोजी संध्याकाळी ५:०० ते ७:०० वाजेच्या दरम्यान राजा सिंह यांनी तलबकट्टा, भवानी नगर, इंजिनबोली, बाबा नगर, बहादुरपुरा, संतोष नगर, याकुतपुरा, गोलकोंडा आणि जिरा यासारख्या भागांना भेट दिली. 
 

Web Title: MLA Raja Singh: 'Listen to our words, use bulletproof vehicle', police request BJP MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.