Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:05 IST2025-06-06T13:05:11+5:302025-06-06T13:05:25+5:30
Raja Raghuvanshi : मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यांची पत्नी सोनम १४ दिवसांपासून बेपत्ता असून धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे एका दरीत राजाचा मृतदेह आढळला, परंतु सोनमचा कोणताही पत्ता लागलेला नाही. कुटुंबाचा दावा आहे की, राजा त्याचा भाऊ विपिनच्या स्वप्नात आला होता आणि त्याची हत्या झाल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
इंदूरमध्ये राजाच्या कुटुंबाने घराबाहेर बॅनर लावले आहेत. ज्यावर "राजाचा आत्मा म्हणत आहे - मी मेलेलो नाही, मला मारण्यात आलं आहे. सीबीआय चौकशी झाली पाहिजे" असं म्हटलं आहे. तसेच "राजा माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला की, माझी हत्या झाली आहे. आम्हाला सीबीआय चौकशी हवी आहे" असं विपिनने देखील म्हटलं आहे.
"बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
शिलाँग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं आहे. सोनमचा शोध घेण्यात येत आहे. इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी (२९) आणि सोनम यांचं ११ मे २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. लग्नानंतर २० मे रोजी नवविवाहित कपल हनिमूनसाठी इंदूरहून गुवाहाटीला निघाले. त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. २२ मे रोजी ते गुवाहाटीहून शिलाँगला पोहोचले. परंतु शिलाँगला पोहोचल्यानंतर ४८ तासांच्या आत, २३ मे रोजी अचानक बेपत्ता झाले.
नवा ट्विस्ट! राजा-सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणारच नव्हते, अचानक का बदलला प्लॅन?
राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे, ज्यामुळे या संपूर्ण घटनेला नवं वळण मिळालं आहे. हनिमूनसाठी पत्नी सोनमसोबत शिलाँगला गेलेल्या इंदूरच्या राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे उघड झालं आहे. पूर्वी खासी हिल्सचे एसपी विवेक सय्यम यांनी ही माहिती दिली आहे. राजाचा मृतदेह एका दरीत सापडला. राजाची ट्री कटरने हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र देखील जप्त केलं आहे.