मंत्री विक्रमादित्य माझ्या टीममध्ये असतील; कंगना रणौत यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 08:08 IST2024-04-14T08:07:30+5:302024-04-14T08:08:32+5:30

कंगना रणौत म्हणाल्या की, विक्रमादित्य  सध्या भाजप कार्यालयात चकरा मारत आहेत.

Minister Vikramaditya will be in my team Kangana Ranaut's claim | मंत्री विक्रमादित्य माझ्या टीममध्ये असतील; कंगना रणौत यांचा दावा

मंत्री विक्रमादित्य माझ्या टीममध्ये असतील; कंगना रणौत यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, कुलु: हिमाचल प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री विक्रमादित्य सिंह सध्या दिल्लीतील भाजप कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत. भविष्यात ते कदाचित माझ्या टीममध्ये सहभागी होतील, असे मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार व अभिनेत्री कंगना रणौत यांनी म्हटले आहे.

विक्रमादित्य सिंह यांना मंडी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कंगना यांनी एका सभेत त्यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, विक्रमादित्य सिंह यांना मी छोटा पप्पू म्हणाल्यामुळे ते नाराज झाले. राजा बेटा, राजा बाबू हे शब्द अवमानकारक नाहीत. मात्र, कलंकित, चारित्र्यहीन असे शब्द भाषणात वापरणे आक्षेपार्ह आहे, असा टोला कंगना यांनी विक्रमादित्य सिंह यांना लगावला.

कंगना म्हणाल्या की, विक्रमादित्यांनी माझ्याबद्दल काही खोटी वक्तव्ये केली आहेत. त्याबद्दल मी योग्य प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांची भाषा बदलली. राज्यात सरकार आल्यानंतर महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जातील, पेन्शन योजना लागू होईल, पाच लाख रोजगार उपलब्ध केले जातील, अशी आश्वासने काँग्रेसने विधानसभा निवडणुकांच्या आधी दिली होती. त्यातील एकही आश्वासन पाळण्यात आलेले नाही.  

Web Title: Minister Vikramaditya will be in my team Kangana Ranaut's claim