"वडील मंत्री आहेत म्हणून मी..."; मंत्र्याचा मुलगा झाला शिपाई, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 02:18 PM2023-12-03T14:18:45+5:302023-12-03T14:23:14+5:30

मंत्र्यांचा मुलगा शिपाई झाल्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. प्रत्येक चौकाचौकात त्याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही ते तुफान व्हायरल होत आहे.

minister satyanand bhokta son mukesh kumar bhokta became civil court peon nephew in waiting list | "वडील मंत्री आहेत म्हणून मी..."; मंत्र्याचा मुलगा झाला शिपाई, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

"वडील मंत्री आहेत म्हणून मी..."; मंत्र्याचा मुलगा झाला शिपाई, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

झारखंडचे कौशल्य विकास मंत्री सत्यानंद भोक्ता यांचा मुलगा मुकेश कुमार भोक्ता याची शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सिविल कोर्टात शिपाई हे पद आहे. तसेच मंत्र्यांचा भाचा रामदेव कुमार भोक्ता हा वेटिंग लिस्टमध्ये आहे. मुकेश कुमार भोक्ता याची एसटी कोट्यातून निवड झाली आहे.

मंत्र्यांचा मुलगा शिपाई झाल्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. प्रत्येक चौकाचौकात त्याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही ते तुफान व्हायरल होत आहे. यावर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. चतरा सिविल कोर्टात शिपाई पदासाठी निवड झालेला मुकेश कुमार भोक्ता म्हणाला की, "प्रत्येकाला आपला रोजगार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. माझी शिपाई पदासाठी निवड झाली आहे. मी माझं काम करेन."

"वडील मंत्री आहेत. याचा अर्थ असा नाही की मी पण राजकारणच केलं पाहिजे. जनतेने त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आहे." झारखंडचे कामगार मंत्री सत्यानंद भोक्ता यांचा मुलगा मुकेश कुमार भोक्ता शिपाई बनल्याची चर्चा केवळ चतरा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण झारखंडमध्ये आहे. चतरा सिविल कोर्टाने जाहीर केलेल्या निकालात मुकेश भोक्ता याची एसटी कोट्यातून निवड झाली आहे.

झारखंडचे कामगार मंत्री सत्यानंद भोक्ता यांनी आपल्या मुलाला शिपायाची नोकरी मिळवून देण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर केल्याचा आरोप काही लोक करत आहेत. चतरा सिविल कोर्टाने जारी केलेल्या निकालात शिपाई पदावर मुकेशचं नाव 13 व्या क्रमांकावर आहे. 

Web Title: minister satyanand bhokta son mukesh kumar bhokta became civil court peon nephew in waiting list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.