शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

मिनी फ्रिज, परफ्युम आणि बरंच काही... 'त्या' कैद्यांची तुरुंगात विशेष सरबराई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 3:51 PM

तुरुंग प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

नवी दिल्ली: तिहार तुरुंगाच्या परिसरातून एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याला सहा मोबाईल, परफ्युमच्या बाटल्या, विदेशातून मागवण्यात आलेली चॉकलेट्स, बिस्किट्स अशा वस्तू सापडल्या आहेत. तुरुंगाजवळ उभ्या असलेल्या एका टोयोटा इनोव्हा गाडीतून या वस्तू आणण्यात आल्या होत्या. घर खरेदीदारांना ताबा न दिल्यानं तुरुंगाची हवा खात असलेल्या अजय आणि संजय चंद्रा यांची तुरुंगात उत्तम बडदास्त ठेवली जात असल्याचं अधिकाऱ्यानं केलेल्या पाहणीतून समोर आलंय.बुधवारी संध्याकाळी एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याला टोयोटा इनोव्हा गाडीत सहा मोबाईल, परफ्युमच्या बाटल्या, विदेशातून मागवण्यात आलेली चॉकलेट्स, बिस्किट्स अशा वस्तू सापडल्या. यानंतर अधिकाऱ्यानं गाडीच्या चालकाजवळ चौकशी करताच, त्याचं नाव विक्रांत महंत असल्याचं समोर आलं. विक्रांत युनिटेक लिमिटेडचे मालक आणि संचालक अजय आणि संजय चंद्रा यांचा कर्मचारी आहे. पाचशे घर खरेदीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी चंद्रा बंधू गेल्या एप्रिल महिन्यापासून तुरुंगात आहेत. तुरुंग परिसरात सापडलेल्या वस्तूंमुळे अधिकाऱ्यांनी तुरुंगात जाऊनही तपास केला. यावेळी त्यांना चंद्रा बंधू असलेल्या तुरुंगात परफ्युमच्या बाटल्या, चॉकलेटचे बॉक्स, एक लहान फ्रिज, दोन मोबाईल, दोन कॉर्डलेस फोन आणि दोन कॉम्प्युटर सापडले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश तिहार तुरुंगाचे महासंचालक अजय कश्यप यांनी दिलेत. ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं चंद्रा बंधूंची रवानगी तुरुंगात केली आहे. चंद्रा बंधूंची संपत्ती विकून ग्राहकांचे पैसे देण्यात यावेत, असे आदेशही न्यायालयानं दिलेत.  

टॅग्स :jailतुरुंग