शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 4:05 PM

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांचं वादग्रस्त विधान; शिवसेना, भाजपाकडून शरसंधान

ठळक मुद्देकर्नाटकातल्या सभेत माजी आमदार वारिस पठाण यांचं वादग्रस्त विधानअसदुद्दीन ओवेसी यांच्या समोरच पठाण बरळलेशिवसेना, भाजपा, मनसेची पठाण यांच्यावर टीका

गुलबर्गा: गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीत असलेल्या शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून मुस्लिम महिलांनी ठिय्या दिला आहे. यावरुन एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांना चिथावणी देणारं विधान केलं आहे. आम्ही १५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी पडू, असं वारिस पठाण यांनी म्हटलं आहे. भायखळ्याचे माजी आमदार असलेले वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केलं. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं. वारिस पठाण यांच्या विधानावर भाजपा, शिवसेनेनं टीकेची झोड उठवली. 'पठाण यांनी जनतेला आव्हान देऊ नये. त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत,' अशा शब्दांत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पठाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेनंदेखील पठाण यांच्या विधानाचा समाचार घेतला. पठाण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कर्नाटकमध्ये त्यांनी हे विधान केलं. कर्नाटकात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी पठाण यांच्यावर कारवाई करावी, असं आवाहन त्यांनी केलं. 

टॅग्स :Waris Pathanवारिस पठाणcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMuslimमुस्लीमHinduहिंदूBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv Senaशिवसेना