Milkha Singh: डोळे मिटण्याआधी आपला विक्रम कुणीतरी मोडावा ही इच्छा अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 07:40 IST2021-06-20T07:39:47+5:302021-06-20T07:40:04+5:30
महान धावपटू मिल्खासिंग यांना भावपूर्ण निराेप

Milkha Singh: डोळे मिटण्याआधी आपला विक्रम कुणीतरी मोडावा ही इच्छा अपूर्णच
चंदीगड : धैर्य आणि इच्छाशक्तीचे प्रतिक असलेले महान धावपटू मिल्खासिंग यांच्या निधनामुळे क्रीडा विश्वाने चकाकता तारा गमावला. कोरोनाशी झुंज अपयशी ठरल्यामुळे शनिवारी ते शरीर सोडून गेले मात्र त्यांचे संपूर्ण आयुष्य धगधगत्या अग्निकुंडासारखे सदैव प्रेरणास्पद राहणार आहे.
डोळे मिटण्याआधी आपला विक्रम कुणीतरी मोडावा ही त्यांची इच्छा अपूर्णच राहीली. ‘फ्लाईंग सिख’ मिल्खासिंग यांच्यावर शनिवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यासोबतच स्वतंत्र भारतात ट्रॅक ॲन्ड फिल्डमध्ये अनेक नवे विक्रम नोंदविणाऱ्या क्रीडायुगाची अखेर झाली.