हरसूल परिसरातून रहिवाशांचे पलायन
By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:11+5:302015-07-22T00:34:11+5:30
गुजरातला आश्रय : गुन्हा दाखल होण्याची भीती

हरसूल परिसरातून रहिवाशांचे पलायन
ग जरातला आश्रय : गुन्हा दाखल होण्याची भीतीनाशिक : हरसूल आणि ठाणापाडा परिसरातील सुमारे अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी आता पलायन करण्यास सुरुवात केली आहे. हरसूल परिसरातील दंगल होऊन आता आठ दिवस उलटत आले आहेत. त्यामधील गुन्हेगारांना अटक करण्यात येऊन त्यांची मध्यवर्ती करागृहात रवानगीही करण्यात आली आहे. त्यानंतरही दंगलीत सहभाग असणार्यांचे अटकसत्र सुरू असून, आज काही ठिकाणी पोलिसांनी केलेल्या वक्तव्याचा रहिवाश्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, अनेकांनी परिसरातून पलायन करण्यास सुरुवात केली आहे. त्यातही गुजरात जवळ असल्याने तेथील आदिवासी भागातील रहिवाशी गुजरातला पलायन करीत आहेत. यानंतरही अनेक रहिवाश्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याने आधीच धास्तावलेल्या हरसूलवासीयांची पाऊस पडल्यानंतर शेतीची कामे सुरू झाली आहेत; परंतु त्यानंतरही पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये साशंकता कायम असल्याने आता पोलिसांनीच रहिवाश्यांना धीर द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीयांकडून होते आहे. लोकांमध्ये दहशत नकोहजारो लोकांना अटक करण्याच्या वृत्ताने लोकांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे. एकीकडे शांतता प्रस्थापित करण्याचे काम होत असताना अशा प्रकारच्या अफवा पसरायला नको. गुन्हेगारांवर कारवाई करायलाच हवी; परंतु त्याचा सामान्य नागरिकांना त्रास व्हायला नको याचीही काळजी प्रशासनाने घ्यावी याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.- खासदार हरिंद्र चव्हाण