धक्कादायक! महिलेने पतीचे अंत्यसंस्कार घरातच केलं, कारण ऐकून अनेकांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 11:48 IST2023-05-30T11:48:22+5:302023-05-30T11:48:41+5:30

आंध्रप्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

mentally ill woman cremates husband at home in andhra pradesh | धक्कादायक! महिलेने पतीचे अंत्यसंस्कार घरातच केलं, कारण ऐकून अनेकांना बसला धक्का

धक्कादायक! महिलेने पतीचे अंत्यसंस्कार घरातच केलं, कारण ऐकून अनेकांना बसला धक्का

आंध्रप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुरनूल जिल्ह्यातील पाथिकोंडा येथे एका महिलेने आपल्या पतीचे अंत्यसंस्कार घरातच केल्याची घटना समोर आली आहे. महिला मानसिक रुग्ण असल्याचे बोलले जात आहे. 

६३ वर्षीय हरी कृष्ण प्रसाद २०१६ पासून पार्किन्सन्स आजाराने त्रस्त होते आणि प्रकृती खालावल्याने २९ मे रोजी त्यांचे निधन झाले. पतीच्या मृत्यूनंतर,पत्नी ललिताम्मा, जी स्वतः काही मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होती, तिने सोमवारी काही टाकून दिलेले कॅन आणि कापडाच्या तुकड्यांसह पतीचे अंत्यसंस्कार केले.

भयंकर! "अजिबात पश्चाताप नाही, ती मला इग्नोर करायची म्हणून..."; साहिलची पोलिसांसमोर कबुली

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिलेला दोन मुले आहेत. मुले असूनही पती-पत्नी दोघेही एकटेच राहत होते. त्यांचा सांभाळ कोणीच केला नाही. दोन्ही मुले चांगल्या ठिकाणी नोकरी करतात. एक मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि दुसरा कॅनडामध्ये राहतो. दोन्ही मुलांनी त्यांच्या पालकांना सोडले आहे आणि मालमत्तेबाबत काही वाद झाला होता.

पोलिसांनी सांगितले की, ललितम्मा या स्वत: समाजापासून दूर राहत होत्या त्यांना मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. यामुळेच त्यांनी पतीच्या मृतदेहावर स्वतःच अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, पण तपासाच्या आधारे त्यांना कोणत्याही कटाचा संशय आला नाही.

Web Title: mentally ill woman cremates husband at home in andhra pradesh