विकृतीचा कळस! गायींसोबत अनैसर्गिक सेक्स करणा-या मनोरुग्णाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 14:01 IST2018-01-18T13:57:39+5:302018-01-18T14:01:18+5:30

मानवी विकृती अत्यंत किळसवाण्या स्तराला पोहोचली आहे. गुजरातमध्येही अशीच एका धक्कादायक घटना समोर आली आहे. माणूस असा कसा वागू शकतो ? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.

Mentally challenged man arrested for unnatural sex with 3 cows | विकृतीचा कळस! गायींसोबत अनैसर्गिक सेक्स करणा-या मनोरुग्णाला अटक

विकृतीचा कळस! गायींसोबत अनैसर्गिक सेक्स करणा-या मनोरुग्णाला अटक

ठळक मुद्देया तिन्ही गायी लालजी राबारी या दूधवाल्याच्या मालकीच्या आहेत.लालजीला त्याच्याकडे काम करणा-या राठोडियावर संशय आला. 

वडोदरा - मानवी विकृती अत्यंत किळसवाण्या स्तराला पोहोचली आहे. गुजरातमध्येही अशीच एका धक्कादायक घटना समोर आली आहे. माणूस असा कसा वागू शकतो ? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार तीन गायींसोबत अनैसर्गिक सेक्स केल्याप्रकरणी पोलिसांनी एका मनोरुग्णाला अटक केली आहे. गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील वरनामा गावात ही धक्कादायक घटना घडली. 

या तिन्ही गायी लालजी राबारी या दूधवाल्याच्या मालकीच्या आहेत. राबारी सोमवारी सकाळी गोठयात गेल्यानंतर काहीतरी चुकीचं घडल असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तीन गायींचे पाय दोरीने बांधलेले होते. चौथी गाय मृतावस्थेत पडलेली होती. गायींसोबत कोणीतरी अनैसर्गिक सेक्स केल्याचा राबारीला संशय आला. लालजीला त्याच्याकडे काम करणा-या राठोडियावर संशय आला. 

कारण दोनवर्षांपूर्वी राठोडीयाने एका वासराबरोबर  अशाच प्रकारचे कृत्य केले होते. लालजीने राठोडियाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर राठोडियाने गुन्ह्याची कबुली दिली. अनैसर्गिक सेक्स, हत्या, प्राण्यांना दुखापत पोहोचवणे आणि धार्मिक भावना दुखावणे या आरोपांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राठोडिया मनोरुग्ण असल्याचे गावक-यांनी पोलिसांना सांगितले. 

Web Title: Mentally challenged man arrested for unnatural sex with 3 cows