मुलाकडून मानसिक छळ अन् मारहाण..; IAS अधिकाऱ्यावर त्यांच्याच आईचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:34 IST2026-01-29T18:23:20+5:302026-01-29T18:34:18+5:30

आपल्याच मुलाविरोधात आईने संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

Mental torture and beating by son; Serious allegations against IAS officer by his own mother | मुलाकडून मानसिक छळ अन् मारहाण..; IAS अधिकाऱ्यावर त्यांच्याच आईचे गंभीर आरोप

मुलाकडून मानसिक छळ अन् मारहाण..; IAS अधिकाऱ्यावर त्यांच्याच आईचे गंभीर आरोप

उत्तर प्रदेश कॅडरचे 2007 बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी अभय सिंह पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांच्या आई रेखा सिंह यांनीच त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रेखा सिंह यांनी राजस्थानातील चित्तौडगड येथील वडिलोपार्जित घर बळकावणे, मानसिक व शारीरिक छळ, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करत राजस्व परिषदकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनंतर प्रकरण नियुक्ती विभागापर्यंत

रेखा सिंह यांनी राजस्व परिषदच्या अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात संपूर्ण घटनाक्रम मांडला आहे. या तक्रारीनंतर प्रकरण पुढील कारवाईसाठी नियुक्ती विभागाकडे पाठवण्यात आले असून, विभागाने अभय सिंह यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

1 जानेवारी 2026 चा कथित प्रकार

तक्रारीनुसार, 1 जानेवारी 2026 रोजी अभय सिंह हे पत्नी माधवी अभय सिंह सोमवंशी यांच्यासोबत चित्तौडगड येथील घरात आले. तेथे कथितरित्या शिवीगाळ व धमक्या आणि मारहाणीचा प्रयत्न केला. याशिवाय, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. जीवाला धोका वाटल्याने आपण खोलीत स्वतःला बंद करून घेतल्याचा दावा रेखा सिंह यांनी केला आहे.

मुलाकडून सातत्याने मानसिक छळ

रेखा सिंह यांचा आरोप आहे की, त्यांचा मुलगा अभय सिंह सातत्याने मानसिक छळ करत असून, स्टाफमार्फत धमक्या देत आहे. या त्रासामुळेच आपल्याला घर सोडावे लागल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तक्रारीसोबत शिवीगाळ, धमक्या आणि मारहाणीशी संबंधित ऑडिओ, व्हिडीओ व मेसेजेस सादर केल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

अभय सिंह यांचा पलटवार

या सर्व आरोपांना अभय सिंह यांनी ठामपणे फेटाळले आहे. सध्या ते राजस्व परिषदेत कार्यरत असून, त्यांनी सांगितले की, त्यांच्या आईवर लहान भाऊ व भावजय यांचा प्रभाव आहे. अभय सिंह म्हणाले की, आई आमच्या कुटुंबीयांच्या प्रभावाखाली आहेत. आमच्या कुटुंबाच्या विविध राज्यांतील मालमत्तांचे चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण होत आहे. 1 जानेवारीला आम्ही पोलिस बंदोबस्तासह चित्तौडगडला गेलो होतो. या प्रकरणात आपण आधीच चित्तौडगड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mental torture and beating by son; Serious allegations against IAS officer by his own mother