शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

‘मासिक पाळीची रजा’ हक्क की रोजगारात अडथळा? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तज्ज्ञांमध्ये दोन गट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 06:18 IST

ज्येष्ठ वकील करुणा नंदी यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले की, “मासिक पाळीतील वेदना ही एक जैविक वस्तुस्थिती आहे. किमान एक दिवसाची पगारी रजा (पेड लिव्ह) देणे ही एक चांगली व्यवहार्य सुरुवात होऊ शकली असती.” सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी न्यायालयाचा तर्क फेटाळून लावला.

नवी दिल्ली : मासिक पाळीच्या रजेबाबत राष्ट्रीय धोरण तयार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. न्यायालयाच्या या भूमिकेचे काही स्तरातून स्वागत होत असतानाच, महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही होत आहे.

ज्येष्ठ वकील करुणा नंदी यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले की, “मासिक पाळीतील वेदना ही एक जैविक वस्तुस्थिती आहे. किमान एक दिवसाची पगारी रजा (पेड लिव्ह) देणे ही एक चांगली व्यवहार्य सुरुवात होऊ शकली असती.” सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी न्यायालयाचा तर्क फेटाळून लावला.

न्यायालयाच्या चिंतेचेही समर्थन दुसरीकडे, वकील सुनीता शर्मा आणि रंजना कुमारी यांनी न्यायालयाच्या चिंतेशी सहमती दर्शवली आहे. अशा बंधनकारक रजेमुळे खासगी क्षेत्रात महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. “मासिक पाळी हा वैयक्तिक विषय असून, महिलांनी पुरुषांच्या तुलनेत आपण कुठेही कमी नाही हे सिद्ध केले आहे. अशा रजेचा गैरवापर होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही,” असे मत सुनीता शर्मा यांनी व्यक्त केले.

चेंडू सरकारच्या कोर्टात न्यायालयाने याचिका फेटाळली असली तरी, केंद्र सरकारने सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून यावर धोरण ठरवावे, अशी सूचना केली आहे. त्यामुळे आता या संवेदनशील विषयावर सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Menstrual leave: Right or hindrance? Supreme Court verdict sparks debate.

Web Summary : Supreme Court rejected plea for menstrual leave policy, triggering debate among experts. Some support paid leave, citing biological reality. Others fear reduced female employment, potential misuse. Government urged to formulate a policy.
टॅग्स :Menstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यHealthआरोग्यEmployeeकर्मचारी