शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांचे आबा (२)

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी अनेकदा ते कार्यकर्त्यांकडे जेवायला जायचे. पण, या गोष्टीचे त्यांनी कधीच राजकीय भांडवल केले नाही़ त्यांच्या याच मनमिळावू स्वभावामुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळायचा अन् म्हणूनच आबा सत्तेत असले वा नसले तरी त्यांच्या सभोवताल गराडा पडायचा़ मराठी चित्रपट त्यांना आवडायचे. नागपुरात दोनदा ते आमच्यासोबत चित्रपट पहायला आले. जेवायला जाताना सुरक्षा रक्षकाला परत पाठवून द्यायचे. कुणालाही कळू द्यायचे नाही. खासगी गाडीत आमच्यासोबत यायचे. आबांना बघून हॉटेलवाला बिल घ्यायचा नाही़ पण, आबा जबरदस्तीने त्याला बिल घ्यायला लावायचे़ नागपूरचा एक कार्यकर्ता मुंबईत आबांना भेटायला गेला. त्याला आर्थिक अडचण होती. आबांनी मला फोन केला अजय पैसे द्या मी परत करील. १५ दिवसांनी मी गेलो तेव्हा आबांनी न विसरता मला पैसे परत केले. वाढदिवस्

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी अनेकदा ते कार्यकर्त्यांकडे जेवायला जायचे. पण, या गोष्टीचे त्यांनी कधीच राजकीय भांडवल केले नाही़ त्यांच्या याच मनमिळावू स्वभावामुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळायचा अन् म्हणूनच आबा सत्तेत असले वा नसले तरी त्यांच्या सभोवताल गराडा पडायचा़ मराठी चित्रपट त्यांना आवडायचे. नागपुरात दोनदा ते आमच्यासोबत चित्रपट पहायला आले. जेवायला जाताना सुरक्षा रक्षकाला परत पाठवून द्यायचे. कुणालाही कळू द्यायचे नाही. खासगी गाडीत आमच्यासोबत यायचे. आबांना बघून हॉटेलवाला बिल घ्यायचा नाही़ पण, आबा जबरदस्तीने त्याला बिल घ्यायला लावायचे़ नागपूरचा एक कार्यकर्ता मुंबईत आबांना भेटायला गेला. त्याला आर्थिक अडचण होती. आबांनी मला फोन केला अजय पैसे द्या मी परत करील. १५ दिवसांनी मी गेलो तेव्हा आबांनी न विसरता मला पैसे परत केले. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला १५ ऑगस्टला गडचिरोलीला जाण्यासाठी यायचे. यावेळी न चुकता रामभाऊ इंगोले यांच्या विमलाश्रमात जायचे. मुलांना भेटवस्तू द्यायचे. गडचिरोलीत नक्षल्यांच्या हल्ल्यात जवान जखमी झाले की न चुकता प्रत्येकवेळी नागपुरात जवानांना भेटायला यायचे, त्यांना हिंमत द्यायचे़ झुणका, भाकर, भरीत हे त्यांचे आवडीचे पदार्थ़
एक आठवण आणखी आहे़ खलाशी लाईनमधील एक मुलगा हरवला होता. अधिवेशन सुरू होते. पोलीस वेळ नाही म्हणत होते. ही गोष्ट आबांच्या कानावर आली़ आबांनी पोलीस यंत्रणेला कामाला लावले अन् तिसऱ्या दिवशी तो मुलगा सापडला. एकदा एक हॉटेल मालक मुंबईत लग्नपत्रिका घेऊन आला. त्याने एका बंद पाकिटात आबांसाठी महागडी डायमंड रिंग दिली अन् निघून गेला़ आबांच्या स्वीय सहायकांनी ही माहिती देताच आबांनी त्याच्याशी त्वरित संपर्क साधला व त्याला माघारी बोलावून ती रिंग त्याला परत केली़
एका हिवाळी अधिवेशनाच्या वेळी जपानी गार्डन येथे सायकल क्लबच्या उद्घाटनासाठी आबा आले होते. उद्घाटनप्रसंगी सर्वांनी आबांना सायकल चालविण्याचा आग्रह धरला. आबा लगेच सायकलवर बसले व झपाझप पॅडल मारत सेमीनरी हिल्सच्या रस्त्याने निघाले. आबा सायकलवर निघाल्याचे पाहून पोलीस मागे धावू लागले. पोलिसांचा ताफाही वेगात त्यांच्या मागे निघाला. हा क्षण कार्यकर्त्यांसह उपस्थितांना सुखावणारा होता. राज्याचे गृहमंत्री असूनही जमिनीवर वावरणारे आबा त्या वेळी प्रत्येकाने अनुभवले. आज ते या जगात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही़
(लेखक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आहेत.)