वर्दीतील माणुसकी! ८ वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी अधिकाऱ्याने नाल्यात मारली उडी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:28 IST2026-01-27T12:28:28+5:302026-01-27T12:28:57+5:30

एक ८ वर्षांचा मुलगा खोल नाल्यात पडला. मुलगा पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बचाव कार्य सुरू केलं.

meerut inspector jumps into drain to save child falling near mandi | वर्दीतील माणुसकी! ८ वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी अधिकाऱ्याने नाल्यात मारली उडी, पण...

वर्दीतील माणुसकी! ८ वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी अधिकाऱ्याने नाल्यात मारली उडी, पण...

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक ८ वर्षांचा मुलगा खोल नाल्यात पडला. मुलगा पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बचाव कार्य सुरू केलं. मुलाचा जीव वाचवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने स्वतः नाल्यात उडी घेतली, मात्र १२ तास उलटूनही अद्याप मुलाचा पत्ता लागलेला नाही.

मेरठच्या टीपी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली रोडवरील नवीन मंडी गेटसमोर सोमवारी ही घटना घडली. हा मुलगा नाल्याच्या काठावर वाकून काचेची बाटली काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खोल नाल्यात पडला. घटनेची माहिती मिळताच टीपी नगरचे प्रभारी अरुण मिश्रा आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रभारी अरुण मिश्रा यांनी कोणतीही वेळ न घालवता स्वतः नाल्यात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. नाल्यामध्ये वरच्या बाजूला कचरा साचलेला होता आणि पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता. गाळ आणि खोली जास्त असल्याने शोधकार्यात प्रचंड अडथळे येत होते. इन्स्पेक्टर मिश्रा यांनी पदाचा विचार न करता एका अनोळखी मुलाचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाचे स्थानिक नागरिक कौतुक करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पोलीस आणि महानगरपालिकेच्या पथकाने जेसीबी मशीन बोलावून नाल्यातील कचरा आणि गाळ उपसण्याचे काम सुरू केलं मुलाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, पण अद्याप यश आलेलं नाही. दरम्यान, टीपी नगरच्या इन्स्पेक्टरनी सांगितलें की, संपूर्ण नाल्याची कसून झडती घेतली आहे, परंतु अद्याप काहीही सापडलेलं नाही. शोध मोहीम सुरू आहे.

Web Title : बच्चे को बचाने के लिए अधिकारी ने नाले में लगाई छलांग, खोज जारी

Web Summary : मेरठ में, एक अधिकारी ने 8 वर्षीय बच्चे को बचाने के लिए नाले में छलांग लगा दी। अधिकारी के प्रयासों और जेसीबी मशीनों से खोज के बावजूद, बच्चा 12 घंटे बाद भी लापता है। जांच जारी है।

Web Title : Officer Jumps into Drain to Save Boy, Rescue Efforts On

Web Summary : In Meerut, an officer bravely jumped into a drain to save an 8-year-old boy who fell in. Despite the officer's efforts and ongoing search operations involving JCB machines, the boy remains missing after 12 hours. Investigations continue.