शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

प्रसार माध्यमांनी चांगल्या कामालाही जागा द्यावी -अनुराग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 6:24 AM

प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य फार महत्त्वाचे आहे. टीका करण्याचा अधिकारही त्यांना आहे. त्याचवेळी चांगल्या कामांना जागाही मिळाली पाहिजे, असे मत केंद्रीय युवक कामकाज व सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य फार महत्त्वाचे आहे. टीका करण्याचा अधिकारही त्यांना आहे. त्याचवेळी चांगल्या कामांना जागाही मिळाली पाहिजे, असे मत केंद्रीय युवक कामकाज व सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.अनुराग ठाकूर यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या येथे झालेल्या भेटीत हे मत व्यक्त केले.  विस्तृतपणे आपले विचार व्यक्त करताना ठाकूर यांनी ‘लोकमत’ नागपूर आवृत्ती सुवर्ण जयंती वर्ष साजरे करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “स्वातंत्र्यलढ्यापासून ते सामान्य माणसाच्या हिताच्या लढाईने ‘लोकमत’ला क्रमांक एकचे स्थान दिले आहे. ‘लोकमत’च्या सुवर्ण जयंती वर्ष कार्यक्रमाला मी आवर्जून येईन.”यावेळी झालेल्या चर्चेत अनुराग ठाकूर म्हणाले की, “माहिती व प्रसारण मंत्री म्हणून जबाबदारी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टपणे मला म्हणाले की, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य फार महत्त्वाचे आहे. मीदेखील असेच मानतो.” आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा करत आहोत. माझे पत्रकारितेशी खूप जवळून नाते राहिले आहे. जेव्हा मी क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचा अध्यक्ष होतो, तेव्हा पत्रकारांशी संबंध होता. हिंदुस्थानची पत्रकारिता खूप जबाबदार आणि सशक्त आहे, असा माझा अनुभव आहे, असे ठाकूर म्हणाले.  ठाकूर म्हणाले, “देशाला मोठे बनविण्याची जबाबदारी ही फक्त सरकारची नाही तर सामान्य माणसाचीही आहे. मला खात्री आहे की, या निकषांवर आमची पत्रकारिता नेहमीच उत्तीर्ण होत राहील.”

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरVijay Dardaविजय दर्डा