मोदींकडून महाराष्ट्राला झुकते माप, नारायण राणेंसह 4 खासदार मंत्रीमंडळ विस्तारात?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 08:58 AM2021-07-06T08:58:30+5:302021-07-06T09:00:33+5:30

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर अभूतपूर्व घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. यासाठी शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडलं.

Measure leaning towards Maharashtra from Center, 4 MP involve modi sarkar cabinet expansion with Narayan Rane | मोदींकडून महाराष्ट्राला झुकते माप, नारायण राणेंसह 4 खासदार मंत्रीमंडळ विस्तारात?

मोदींकडून महाराष्ट्राला झुकते माप, नारायण राणेंसह 4 खासदार मंत्रीमंडळ विस्तारात?

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर अभूतपूर्व घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. यासाठी शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडलं.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. मोदी सरकार २.० मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठ मंत्र्यांकडे अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यामुळेच त्यांच्यावरील जबाबदारी कमी करण्यासाठी पुढील दोन दिवसांत मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला झुकते माप देण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रातील 4 नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर अभूतपूर्व घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. यासाठी शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडलं. शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलानंदेखील भाजपची साथ सोडली. त्यामुळे दोन मंत्रिपदं रिक्त झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला असलेलं मंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. या पदासाठी राज्यसभेचे खासदार नारायण राणेंची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. राणेंसह आणखी 3 खासदारांना मंत्रीपदे देण्यात येणार असल्याचे वृत्त झी 24 तासने दिले आहे. 

राज्यसभा खासदार डॅा. भागवत कराड आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनाही मोदी 2.0 मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच, रणजित निंबाळकर यांनाही केंद्रात स्थान मिळणार असल्याचे समजते. वंजारी समाजात कराड यांची चांगली प्रतिमा आहे, त्यामुळे त्यांना स्थान मिळू शकते. तर, बीडच्या खासदार प्रितम मुंडेंच्या नावाची केवळ चर्चाच झाल्याचे दिसून येते. 

राणेंना दिल्लीचं बोलवण

नारायण राणेंना दिल्लीहून तातडीचं बोलावणं आले असून राणे आजच दिल्लीला रवाना होतील. ते दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राणेंनी या विषयावर काम केलं. आताही ते या मुद्द्यावरून राज्य सरकारवर घणाघाती टीका करत आहेत. याशिवाय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. त्याचा विचार करूनही राणेंना मंत्रिपद देण्यात येईल असं बोललं जातं. 

Web Title: Measure leaning towards Maharashtra from Center, 4 MP involve modi sarkar cabinet expansion with Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.