mayur Shelke's courage is appreciated all over the country; Banner flashed in Tamil Nadu village too! | मराठमोळ्या मयूर शेळकेच्या धाडसाचं देशभरात कौतुक; तामिळनाडूच्या गाावतही झळकला बॅनर!

मराठमोळ्या मयूर शेळकेच्या धाडसाचं देशभरात कौतुक; तामिळनाडूच्या गाावतही झळकला बॅनर!

ठळक मुद्देमयूर यांच्या कार्यकर्त्वाने अनेक सीमा ओलांडल्या आहेत. त्यातच, भाषेच्याही सीमा ओलांडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तामिळनाडूतील वद्दूवूर या छोटाशा गावात मयूर यांच्या कर्तत्वाचे आभार मानणारे, कौतुक करणारे बॅनर झळकले आहे.

मुंबई - नवी मुंबईतील वांगणी रेल्वे स्थानकावरील पॉइंटमनने प्रसंगावधानता दाखवत एका अंधमातेच्या चिमुकल्‍याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. पॉइंटमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुलाचा जीव वाचवला. मयूर शेळकेंच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मयूर यांच्या बहादूर कामगिरीला सॅल्यूट करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तामिळनाडूतील एका छोट्याशा गावातही मयूर शेळकेंचा डिजिटल बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले. 

शौर्यमॅन मयूर शेळकेंवर अभिनंदनासह बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूरच्या धाडसाचं कौतुक केल्यानंतर रेल्वेकडून 50 हजार रुपयाचं बक्षीस मयूर यांना जाहीर करण्यात आलं होतं. तर, अनेक ठिकाणी त्यांचे सत्कारही करण्यात येत आहेत. रेल्वेकडून त्यांना मिळालेल्या ५० हजारांच्या बक्षीसामधील २५ हजार रुपये मयूर शेळके यांनी अंधमात संगीता शिरसाट यांना देण्याचा निश्चय केलाय. त्यामुळे, मयूर शेळकेंच्या धाडसासह त्यांच्या दातृत्वाचंही कौतुक होतंय. शिरसाट यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याचं मला समजलं. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. ही रक्कम संगीता यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी उपयोगी ठरेल,' असं शेळके यांनी सांगितलं.

मयूर यांच्या कार्यकर्त्वाने अनेक सीमा ओलांडल्या आहेत. त्यातच, भाषेच्याही सीमा ओलांडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तामिळनाडूतील वद्दूवूर या छोटाशा गावात मयूर यांच्या कर्तत्वाचे आभार मानणारे, कौतुक करणारे बॅनर झळकले आहे. 'मयूर तुम्ही खरे हिरो आहात, तुमच्या धाडसीपणाचं करावं तेवढ कौतुक कमी आहे. आपण जीवाची बाजी लावून काही सेकंदात एका अंध मातेच्या 6 वर्षीय मुलाचा जीव वाचवला. आमच्या संपूर्ण गावाकडून तुमचं अभिनंदन !' असा मजकूर या डिजिटल बॅनरवर झळकला आहे.  

रेल्वेमंत्र्यांकडून कौतुक

वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस येत असतानाच चिमुकला रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्यावेळी, तेथील पॉईंटमनने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला. रेल्वेचे पॉइंटमन मयूर शेळके यांनी दाखवलेल्या हिमतीचा अभिमान वाटत असल्याचं ट्विट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे. 

अंध मातेची होती इच्छा 

दुसरीकडे ज्या अंध मातेच्या बाबतीत ही घटना घडली त्या मातेनंही मयूरच्या धाडसाचं कौतुक केलंय. मयूर शेळकेमुळेच आज माझा मुलगा माझ्याजवळ आहे. मयूर यांना एखादा पुरस्कार आणि गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी संगिता शिरसाट या अंध मातेनं केली होती. या अंधमातेच्या मागणीला यश आलं असून मयूर यांच्यावर बक्षीसांचा वर्षाव होत आहे.  

रेल्वे विभागाकडून 50 हजारांचं बक्षीस

मयूर शेळके यांचा रेल्वे विभागाकडून सन्मान करण्यात आला आहे. तसेच, 50 हजार रुपयांचे बक्षीसही त्यांना रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मयूरच्या धाडसाचे कौतुक करत, आपण केलेलं काम अतुलनीय असल्याचं म्हटलंय. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देणार असल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलंय. 

जावाकडून नवीन बाईक गिफ्ट

जावा हिरोज इनिटीएटीव्हच्या धोरणानुसार शेळके यांस नवीन जावा बाईक गिफ्ट देण्यात आली. क्लासिक लीजेंडचे प्रमुख अनुपम थेरजा यांनी याची घोषणा केली आहे. महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्र यांनीही मयूर शेळकेंच कौतुक केलंय. मयूर यांच्याजवळ खास ड्रेसकोट किंवा टोपी नाही, तरीही मयूर यांनी सुपरहिरोच्या तुलनेत अधिक धाडसी काम केलंय, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mayur Shelke's courage is appreciated all over the country; Banner flashed in Tamil Nadu village too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.