मायावतींचा मोठा निर्णय! स्वतःच्या भाच्याचीच पक्षातून केली हकालपट्टी, कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:14 IST2025-03-03T18:10:33+5:302025-03-03T18:14:48+5:30

Mayawati Akash Anand: बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भाचा आकाश आनंद यांची आधी पदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता त्यांना पक्षातूनच बाहेर काढण्यात आले आहे. 

mayawati takes big decision akash anand expelled from bsp | मायावतींचा मोठा निर्णय! स्वतःच्या भाच्याचीच पक्षातून केली हकालपट्टी, कारणही सांगितलं

मायावतींचा मोठा निर्णय! स्वतःच्या भाच्याचीच पक्षातून केली हकालपट्टी, कारणही सांगितलं

Mayawati Expelled Akash Anand: बहुजन समाज पार्टीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. माजी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांचे भाचे आकाश आनंद यांना आता थेट पक्षातूनच बाहेरच रस्ता दाखवला आहे. १५ महिन्यांपूर्वी मायावतींनी आकाश आनंद यांना त्यांचा राजकीय उत्तराधिकारी बनवले होते. पण, त्यांची भूमिका आणि निर्णयामुळे मायावतींनी पक्षातून हकालपट्टी केली. सोमवारी त्यांनी या निर्णयाची माहिती दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मायावती यांनी एक पोस्ट करत आकाश आनंद यांची वर्तणूक आणि भूमिकेचा मुद्दा अधोरेखित केला आहे. 

बसपाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे की, 'बसपाच्या काल (२ मार्च) झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील बैठकीत आकाश आनंद यांना पक्षाच्या हितापेक्षा पक्षातून निलंबित केलेल्या त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या प्रभावाखाली राहिल्याने राष्ट्रीय समन्वयक पदासह इतर सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्यात आले होते. याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करून परिपक्वता दाखवणे अपेक्षित होते.'

स्वार्थी गर्विष्ठ सासऱ्याच्या प्रभावाखाली...

मायावतींनी पुढे म्हटलं आहे की, 'आकाश आनंद यांनी याउलट जी भलीमोठी प्रतिक्रिया दिली आहे, ती त्यांच्या पश्चातापाची किंवा राजकीय समजुतदारपणाची नाहीये; तर त्यांच्या सासऱ्याच्या प्रभावाखाली आहे. जे स्वार्थी, गर्विष्ठ आणि निष्ठावंत नाहीयेत. अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला मी पक्षाच्या लोकांना देत आलीये आणि त्यांना शिक्षाही केली आहे.' 

'अंतिमतः परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आत्म सन्मान आणि स्वाभिमानी चळवळीचे हित, त्याचबरोबर कांशीराम यांची शिस्तीची परंपरा पाळत मी आकाश आनंद यांना त्यांच्या सासऱ्याप्रमाणे पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी पक्षातून निलंबित करत आहे', अशी घोषणा मायावती यांनी केली. 

१८ दिवसांपूर्वी केली होती अशोक सिद्धार्थ यांची हकालपट्टी

आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांचीही बहुजन समाज पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. १८ दिवसांपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी २०२५ रोजी मायावती यांनी अशोक सिद्धार्थ आणि त्यांचे निकटवर्तीय नितीन सिंह यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. 

पक्षामध्ये गटबाजी आणि शिस्तभंग केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. अशोक सिद्धार्थ आणि नितीन सिंह यांना समज देण्यात आली होती, पण तरीही त्यांच्याकडून पक्षात गटबाजी करण्याचे काम सुरू आहे, असे म्हणत मायावतींनी पक्षातून निलंबित केले होते. 

 

Web Title: mayawati takes big decision akash anand expelled from bsp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.