देशातील सर्वात तरुण न्यायाधीश; 21 वर्षीय मयंक सुनावणार न्यायालयात निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 17:58 IST2019-11-22T17:58:00+5:302019-11-22T17:58:16+5:30

जयपूरमधील 21 वर्षीय मयंक प्रताप सिंह देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून कामकाज पाहणार आहे.

Mayank Pratap Singh, 21, will be the youngest judge in the country. | देशातील सर्वात तरुण न्यायाधीश; 21 वर्षीय मयंक सुनावणार न्यायालयात निकाल

देशातील सर्वात तरुण न्यायाधीश; 21 वर्षीय मयंक सुनावणार न्यायालयात निकाल

जयपूरमधील 21 वर्षीय मयंक प्रताप सिंह देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून कामकाज पाहणार आहे. मयंक 2018च्या विधी सेवा परिक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्याच्यावर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

मयंकला याबाबत विचारण्यात आल्यावर मला स्वत:चाच अभिमान वाटत असून माझ्या यशामागे शिक्षक आणि परिवार यांचे मोठे योगदान असल्याचे त्याने सांगितले. त्याचप्रमाणे मला कायद्याच्या सेवेसोबतच देशभरात न्यायाधीशांना मिळणार मान, आदर हे बघता मला देखील त्यांच्याप्रमाणे न्यायाधीश होण्याचे स्वप्न होते व ते आज पूर्ण झाल्याने मला आनंद असल्याचे मयंकने सांगतिले. त्यामुळे आता 21 वर्षीय मयंक न्यायालयात निकाल सुनावणार असल्याने आम्हाल अभिमान वाटत असल्याचे मयंकच्या कुटुंबाने सांगितले आहे.

Web Title: Mayank Pratap Singh, 21, will be the youngest judge in the country.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.