मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट, १० कामगारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:08 IST2026-02-05T16:55:55+5:302026-02-05T17:08:31+5:30
मेघालयात येथील ताश्खाई कोळसा खाणीत अचानक एक शक्तिशाली स्फोट झाला, यामुळे कामगार आत अडकले. सर्व मृत आसामचे असल्याचा संशय आहे.

मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट, १० कामगारांचा मृत्यू
मेघालयातील ताश्खाई परिसरातील एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत किमान १० कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताश्खाई कोळसा खाणीत अचानक एक शक्तिशाली स्फोट झाला, यामुळे कामगार आत अडकले. स्फोट इतका शक्तिशाली होता की आत असलेले कामगार बाहेर पडू शकले नाहीत. सर्व मृत आसामचे असल्याचा संशय आहे, प्रशासनाने याबाबत अजूनही माहिती दिलेली नाही.
पीएम मोदी संसदेत आले असते, तर अनुचित प्रकार घडला असता; ओम बिर्लांनी व्यक्त केली नाराजी
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी एक कामगार आसामच्या कटिगरा भागातील बिहारा गावचा रहिवासी असल्याचे मानले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच मेघालय पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले. खाणीत अडकलेल्या इतर कामगारांना शोधण्यासाठी सखोल शोध मोहीम सुरू आहे.
परिसरात सुरक्षा वाढवली
बचाव कार्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून प्रशासनाने आजूबाजूचा परिसराला वेढा घातला असून सुरक्षा वाढवली आहे. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला, खाणीतील गॅस गळती किंवा तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे.
या अपघातानंतर कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल आणि बेकायदेशीर खाणकामांबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.