अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 23:34 IST2025-10-09T23:33:14+5:302025-10-09T23:34:21+5:30
Cylinder Explosion In Ayodhya: सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन घर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना अयोध्येतील पूराकलंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पगला भारी गावात घडली आहे.

अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती
सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन घर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना अयोध्येतील पूराकलंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पगला भारी गावात घडली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. तसेच हा स्फोट नेमका कसा झाला याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गॅसची गळती झाल्याने स्फोट होऊन ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे, अयोध्येचे सीओ देवेश चतुर्वेदी यांनी सांगितले की, घरातील घरगुती गॅस सिलेंडर फुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे प्राथमिक तपासामध्ये दिसत आहे. तसेच आतापर्यंत या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट एवढा प्रचंड होता की, त्यामध्ये आजूबाजूच्या घरांचं आणि दुकानांचं नुकसा झालं. बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचं काम हाती घेतलं आहे. तसेच प्रशासनाकडून या दुर्घटनेमागच्या कारणांचा तपास केला जात आहे. दरम्यान, या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.