शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरीच्या मुद्यावरून संसदेत प्रचंड गोंधळ

By admin | Updated: July 31, 2014 03:33 IST

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पाळत ठेवणारी उपकरणे आढळल्याचा मुद्दा अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी आज बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात लावून धरला़

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पाळत ठेवणारी उपकरणे आढळल्याचा मुद्दा अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी आज बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात लावून धरला़ या मुद्यावरून काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला़ यामुळे लोकसभेचे कामकाज दोनदा तर राज्यसभेचे कामकाज चारदा स्थगित करण्यात आले़ दरम्यान; गडकरींच्या निवासस्थानी पाळत ठेवणारी उपकरणे आढळल्याचे वृत्त केंद्र सरकारने स्पष्टपणे फेटाळून लावले़लोकसभेत शून्यप्रहरात काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा लावून धरला़ गुजरातेत कथितरीत्या २९ हजार लोकांचे फोन टॅप केले गेलेत़ आता किती मंत्री, खासदार व नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे, हे सरकारने सांगावे, असे खरगे म्हणाले़ तिकडे राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला़ सरकारने मोठ्या प्रमाणात फोन टॅपिंगची परवानगी दिली आहे़ हा गंभीर मुद्दा आहे़ याहीपेक्षा एका केंद्रीय मंत्र्याच्या निवासस्थानी पाळत ठेवणारी उपकरणे आढळणे, गंभीर प्रकरण आहे़ याचसोबत काँग्रेस सदस्यांनी ‘मोदी मॉडेल नही चलेगा, आम्हाला जेपीसी (संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी) हवी’, अशी घोषणाबाजी सुरू केली़ या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज चारदा तहकूब करावे लागले़गोंधळानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही सभागृहात स्पष्टीकरण देताना, टेहळणी उपकरणे सापडल्याचे वृत्त फेटाळून लावले़ मीडियातील संबंधित वृत्त पूर्णत: निराधार आहे़ खुद्द गडकरींनी याचा इन्कार केला आहे, असे ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)