मसूद अजहरच्या मदतीला पुन्हा धावला चीन, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात पुन्हा खोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 12:50 PM2017-11-03T12:50:58+5:302017-11-03T12:51:37+5:30

पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार व जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनकडून पुन्हा एकदा खोडा घालण्यात आला आहे.

Masood again ran to the aid of Azhar, reopen the way for China to declare an international terrorist | मसूद अजहरच्या मदतीला पुन्हा धावला चीन, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात पुन्हा खोडा

मसूद अजहरच्या मदतीला पुन्हा धावला चीन, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात पुन्हा खोडा

Next

बीजिंग : पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार व जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनकडून पुन्हा एकदा खोडा घालण्यात आला आहे. चीनने पुन्हा एकदा सर्वानुमत नसल्याचे कारण पुढे करत हा प्रस्ताव फेटाळून लावला.

गेल्यावर्षीही चीनने संयुक्त राष्ट्रात ‘नकाराधिकाराचा’ वापर करत भारताच्या प्रयत्नांना खीळ घातली होती. अमेरिका, फ्रान्स व इंग्लंड यांनी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्तपणे प्रस्ताव मांडला होता. गेल्यावर्षी मार्च महिन्यात १५ देशांचा समावेश असलेल्या संयुक्त राष्टाच्या समितीमध्ये हा ठराव मांडण्यात आला होता. तेव्हा चीन वगळता उर्वरित १४ देशांनी भारताच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली होती. हा प्रस्ताव मान्य झाला असता तर मसूद अजहरची संपत्ती गोठवली गेली असती आणि त्याच्यावर प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली असती. 

गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कारण पुढे करत चीनने हा प्रस्ताव अडवून ठेवला होता. मात्र, आज ती मुदत संपुष्टात आली. ऑगस्ट महिन्यात चीनने या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतली होती. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीनकडून वारंवार मसूद अजहरच्या वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 

Web Title: Masood again ran to the aid of Azhar, reopen the way for China to declare an international terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.