शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

Coronavirus: परदेशातून परतलेल्या मेरी कोम यांनी क्वॉरंटाइन प्रोटोकॉल तोडला, राष्ट्रपतींसोबत घेतला 'ब्रेकफास्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 4:31 PM

मेरी कोम या जॉर्डन येथील अम्मान येथे एशिया-ओशिनिया ऑलिम्पिक क्वालीफायरमध्ये सहभागी झाल्यानंतर 13 मार्चला भारतात परतल्या. त्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 14 दिवसांसाठी स्व-एकांतवासात राहणार होत्या.

ठळक मुद्देमेरी कोम राष्ट्रपती भवनातील एका कार्यक्रमात झाल्या होत्या सहभागीजागतीक आरोग्य संघटनेने संक्रमित लोकांचे विलगिकरण करण्याची दिल्या आहेत सूचनायाच दिवशी, आमदार दुष्यंत सिंह हे कनिका कपूर यांच्या संपर्कात आले होते

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. यातच बॉक्सर आणि राज्यसभेच्या खासदार मैरी कोम यांनी 14-दिवसांचा क्वॉरंटाइन प्रोटोकॉल तोडला आहे. मेरी कोम या जॉर्डन येथील अम्मान येथे एशिया-ओशिनिया ऑलिम्पिक क्वालीफायरमध्ये सहभागी झाल्यानंतर 13 मार्चला भारतात परतल्या. त्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 14 दिवसांसाठी स्व-एकांतवासात राहणार होत्या.

राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात झाल्या सहभागी -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, संक्रमित लोकांचे विलगिकरण करण्यात यावे, अशी सूचना जागतीक आरोग्य संघटनेने केली आहे. तसेच सरकारनेही सुरक्षिततेच्या कारणास्तव, जे लोक परदेशातून आले आहेत, त्यांनी 14 दिवसांपर्यंत स्वतःला एकांतवासात ठेवावे, असे सांगितले आहे. मात्र, मेरिकोम या 18 मार्चला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या ब्रेकफास्टमध्ये सहभागी झाल्या. राष्ट्रपती कोविंद यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ट्विट केलेल्या चार फोटोंपैकी एकात मेरिकोम दिसत आहेत. 

शेअर केलेल्या या फोटोला, राष्ट्रपती कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील खासदारांसाठी ब्रेकफास्टचे आयोजन केले, असे कॅप्शन देण्यात आले होते.

याच दिवशी, भाजप आमदार दुष्यंत सिंह, हे कोरोनाची लागण झालेल्या बॉलीवुड गायक कनिका कपूर यांच्या संपर्कात आले होते. सिंह आता स्व-एकांतवासात आहेत. बॉक्सिंग कोच सँटियागो नीवा यांनी शुक्रवारी म्हटले होते, की जॉर्डनमध्ये गेलेले सर्व भारतीय बॉक्सर्स 14-दिवसांच्या स्व-एकांतवासात आहेत. त्यांनी म्हटले आहे, की आम्ही स्व-एकांतवासासाठी 10 दिसांची योजना आखली होती. मात्र आता ती 14 दिवस करण्यात आली आहे.

मेरी कोमचे स्पष्टिकरण -

मेरी कोम म्हणाल्या, आपण राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात उपस्थित होतो, मी जॉर्डनहून परतल्यापासून घरीच आहे. केवळ राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातच सहभागी झाले. यावेळी मी दुष्यंत सिंह यांना भेटले नाही आणि हस्तांदोलनही केले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMary Komमेरी कोमRamnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षBJPभाजपा