Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:31 IST2025-06-18T16:30:09+5:302025-06-18T16:31:27+5:30
एका विवाहित महिलेला तिच्या पतीने बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच विवाहित महिलेने फिल्मी स्टाईलने थेट हॉटेलच्या छतावरून उडी मारली .

Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एका विवाहित महिलेला तिच्या पतीने बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच विवाहित महिलेने फिल्मी स्टाईलने थेट हॉटेलच्या छतावरून उडी मारली आणि पळून गेली. लोकांनी तिच्या बॉयफ्रेंडला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.
बरौत कोतवालीचे प्रभारी निरीक्षक मनोज कुमार चहल यांनी बुधवारी (१८ जून) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी बरौत शहरातील छपरौली रोडवरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. महिला तिचा बॉयफ्रेंड शोभितसोबत हॉटेलमध्ये आली होती पण त्यानंतर तिचा पती आणि तिच्या सासरचे इतर सदस्य तिथे पोहोचले. महिला तिच्या पतीला पाहून घाबरली आणि हॉटेलच्या १२ फूट उंच छतावरून उडी मारून पळून गेली.
OYO में ससुराल,महिला लगाएं छंलाग
— Tushar Rai (@tusharcrai) June 17, 2025
यूपी के बागपत बड़ौत में OYO की पिछली खिड़की की दीवार कूद विवाहिता फरार।होटल में प्रेमी के साथ आई थी। कूदकर बचाई लाज। ससुरालवालों ने वीडियो बनाया। पति ने पत्नी से जान का खतरा बताया, काफी समय से चल रहा था विवाद। pic.twitter.com/X8bqOolRkC
या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये ती छतावरून उडी मारताना दिसत आहे. विवाहित महिलेच्या बॉयफ्रेंडला पकडण्यात आलं आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे. पतीच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तुघाना गावातील एक तरुण भाड्याने हॉटेल चालवत होता आणि त्याचीही चौकशी केली जात आहे.
पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, महिलेचं लग्न २०१९ मध्ये काकोर गावातील एका तरुणाशी झालं होतं आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. पतीचा आरोप आहे की, महिलेचे लग्नापूर्वीही काही लोकांशी संबंध होते, जे लग्नानंतरही सुरू आहेत. विरोध केल्यावर पत्नी त्याला खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून जीवे मारण्याची धमकी देत होती.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.